Football  Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एफसी गोवा-हैदराबाद सामना लांबणीवर

आयएसएल फुटबॉल स्पर्धेला 21 सप्टेंबरपासून सुरवात होईल

किशोर पेटकर

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यंदा पहिला सामना खेळण्यासाठी एफसी गोवा संघाला ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागेल.

त्यांचा स्पर्धेच्या दहाव्या आवृत्तीतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे हैदराबाद एफसीविरुद्ध होणार होता. मात्र स्पर्धा आयोजकांनी हा सामना लांबणीवर टाकल्याची घोषणा शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे केली.

यावेळच्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेला 21 सप्टेंबरपासून सुरवात होईल. पहिला सामना कोची येथे केरळा ब्लास्टर्स व बंगळूर एफसी यांच्यात खेळला जाईल.

22 रोजी होणारा हैदराबाद-गोवा यांच्यातील सामना लांबणीवर टाकल्याची घोषणा करताना आयएसएलने अधिकृत कारण दिलेले नाही, नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे.

एफसी गोवाचा स्पर्धेतील दुसरा सामना दोन ऑक्टोबर रोजी पंजाब एफसीविरुद्ध फातोर्डा येथे नियोजित आहे.

प्राप्त माहितीनुसार, चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघात संदेश झिंगन (एफसी गोवा) व चिंग्लेनसाना सिंग (हैदराबाद एफसी) या प्रमुख खेळाडूंना सामावून घेतले आहे.

फुटबॉल स्पर्धा १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. संदेश व चिंग्लेनसाना यांची भारतीय संघात निवड झाल्यानंतर या दोन्ही संघातील आयएसएल सामना लांबणीवर टाकणे लक्षणीय मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT