Ishan Kishan X
क्रीडा

Ishan Kishan: बेशिस्तीचा ठपका..., संघातून डच्चू... अन् आता ईशानच्या नव्या व्हिडिओची जोरदार चर्चा

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्याच्या दरम्यानच ईशान किशनचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Ishan Kishan Video Viral:

भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला संधी देण्यात आलेली नाही. आता त्यातच त्याने शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केल्याने त्याची चर्चा होत आहे.

बीसीसीआयने शुक्रवारी रात्री भारतीय कसोटी संघाची घोषणा केली होती. त्याआधी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास इशानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फक्त एक पळण्याचा इमोजी टाकला आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये तो मेडिटेशन करताना, धावताना आणि सराव करताना दिसत आहे. मात्र, त्याने हा व्हिडिओ कोणत्या हेतूने टाकला आहे, याबद्दल मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु, गेल्या काही दिवसात त्याच्याबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा होत आहेत.

खरंतर डिसेंबर 2023 - जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान, ईशानने मानसिक थकव्याचे कारण देत विश्रांतीची मागणी केली होती. त्यामुळे संघव्यवस्थेने त्याला विश्रांती दिली होती.

मात्र त्यानंतर जेव्हा सध्या चालू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20

मालिकेसाठी त्याची निवड भारतीय संघात झाली नाही, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. अनेक मीडियातील रिपोर्ट्सनुसार अविश्वास आणि बेशिस्तीच्या कारणामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.

मात्र, नंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले की त्याच्याबाबत बेशिस्तीसारख्या गोष्टींची समस्या नाही. द्रविडने सांगितले की त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान विश्रांतीची मागणी केली होती आणि ती त्यांनी मान्य केली.

तसेच तो अद्याप निवडीसाठी उपलब्ध व्हायचा असल्याचे द्रविडने सांगितले होते. त्याचबरोबर द्रविडने असेही सांगितले होते की तो ज्यावेळी खेळण्यासाठी उपलब्ध होईल, त्यावेळी तो देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि स्वत:ला भारतीय संघातील निवडीसाठी उपलब्ध करेल.'

दरम्यान, झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पीटीआयला सांगितले होते की ईशानने अद्याप खेळण्यासाठी संपर्क केलेला नाही. ज्यावेळी तो त्याच्या उपलब्धतेबद्दल सांगेल, तेव्हा त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाईल. सध्या झारखंड संघ रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असून ईशान सध्या संघाचा भाग नाही.

या सर्व गोष्टी होत असतानाच आता ईशानने व्हिडिओ शेअर केल्याने चाहत्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT