KL Rahul
KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final: भारतीय संघ जाहीर! केएल राहुलच्या जागी 'या' खेळाडूला मिळाले स्थान

Pranali Kodre

BCCI named KL Rahul replacement in India squad for WTC Final: सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. आगामी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केएल राहुलच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. याशिवाय राखीव खेळाडूंमध्येही तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआयने ईशान किशनला दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे. केएल राहुल आयपीएल 2023 स्पर्धेत 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तो या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता.

त्याला मांडीची दुखापत झाली असून आता त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिऍबिलेटेशन प्रक्रियेला तो सामोरे जाईल. त्याचमुळे त्याला 7 जूनपासून द ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे.

याशिवाय राखीव खेळाडूंमध्ये बीसीसीआयने तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव या तिघांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे.

अन्य खेळाडूंच्या फिटनेसबाबतही अपडेट

बीसीसीआयने जयदेव उनाडकट आणि उमेश यादव यांच्या फिटनेसबाबतही अपडेट दिले आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघातील उनाडकटला नेट सरावादरम्यान खांद्याची दुखापत झाली आहे. सध्या तो त्याच्या या दुखापतीवर बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करत आहे.

त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यामधील त्याच्या सहभागावर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

याशिवाय उमेश यादवलाही आयपीएल 2023 स्पर्धेतील 36 व्या सामन्या कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. सध्या त्याच्यावर कोलकाताचे वैद्यकिय पथक उपचार करत असून त्याने हळू हळू गोलंदाजीला सुरुवात केली आहे. तसेच बीसीसीआयचे वैद्यकिय पथकही त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

असा आहे भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT