Ishan Kishan Video Twitter
क्रीडा

IND vs ZIM: राष्ट्रगीतादरम्यान इशान किशनवर मधमाशीचा हल्ला- Video Viral

भारतीय क्रिकेट संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहोचला. राष्ट्रगीतादरम्यान टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर मधमाशीने हल्ला केला.

दैनिक गोमन्तक

Ishan Kishan Video: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. भारताने हा सामना एकतर्फी 10 गडी राखून जिंकला. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहोचला. राष्ट्रगीतादरम्यान टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर मधमाशीने हल्ला केला, ज्यानंतर त्याचा हा व्हिडिओ आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ईशान किशन मधमाशी पाहून अस्वस्थ झाला आणि थोड्या वेळासाठी ती घाबरल्याचे दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. इशान किशन राष्ट्रगीतामध्ये पूर्णपणे मग्न होता, तेव्हा एक मधमाशी त्याच्या कानाजवळ आली आणि तो गोंधळला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 40.3 षटकात केवळ 189 धावांवर गारद झाला. फेब्रुवारी 2022 नंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरने सात षटकांत 23 धावा देत तीन बळी घेतले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद सिराजच्या खात्यात एक विकेट गेली. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगिस चकाबवाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 35 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 30.5 षटकांत लक्ष्य गाठले. शिखर धवन 81 आणि शुभमन गिल 82 धावा करून नाबाद परतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delimitation Bill 2026: अटी पूर्ण झाल्यास डिलिमिटेशन बिलाला साथ! ए. राजा यांनी स्पष्ट केली DMK ची भूमिका; चेन्नईतील बैठकीत मोठा निर्णय

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील हल्ला प्रकरणात आणखी 4 कैद्यांना अटक; आरोपींची संख्या सातवर

पॉवर, लूक आणि जबरदस्त फीचर्सचा भन्नाट मेळ! Royal Enfield Himalayan 750 बाजारात दाखल; 55 BHP पॉवर, 63 Nm टॉर्क आणि 5 रायडिंग मोड्सने वाढवली रायडर्सची उत्सुकता

Under 19 Cricket: गोव्याच्या गोलंदाजांचा ओडिशाला लगाम; पहिल्या डावातील आघाडीसाठी संघ सज्ज

National Badminton Championship: राष्ट्रीय एकेरीत सुवर्ण जिंकणारी पहिली गोमंतकीय; 10 वर्षांच्या अमायरा धुमटकरचा ऐतिहासिक पराक्रम

SCROLL FOR NEXT