Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Rankings: बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या ईशानची ICC क्रमवारीत गगनभरारी!

Ishan Kishan & Virat Kohli ICC ODI Rankings: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक झळकावले.

दैनिक गोमन्तक

Ishan Kishan & Virat Kohli ICC ODI Rankings: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक झळकावले. ईशानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 131 चेंडूत 210 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीनंतर ईशानने आयसीसी वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ताज्या ICC क्रमवारीत ईशान किशन 37 व्या स्थानावर पोहोचला आहे.

वास्तविक, या खेळीनंतर ईशानने 117 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रमवारीतही चांगली सुधारणा झाली आहे.

विराट कोहलीला 2 अंकाचा फायदा झाला आहे

विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. विराटने 91 चेंडूत 113 धावा केल्या. ऑगस्ट 2019 नंतर विराट कोहलीचे वनडे फॉरमॅटमधील हे पहिले शतक होते. आता, आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत विराट कोहलीला याचा फायदा झाला आहे. या खेळीनंतर तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर या सामन्यापूर्वी तो दहाव्या क्रमांकावर होता.

याशिवाय, श्रेयस अय्यर 20 व्या स्थानावरुन 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन यांनाही ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत फायदा झाला आहे.

मोहम्मद सिराजलाही गोलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी तो 26 व्या स्थानावर होता. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन गोलंदाजांच्या क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या अष्टपैलू खेळाडूला मान मिळाला आहे.

दुसरीकडे, आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुचेने पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 62 रेटिंग गुणांचा फरक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT