Ranji Cricket | Ishan Gadekar Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Cricket: ईशान गडेकरचा पदार्पणात शतकी पराक्रम; गोव्याचे केरळवर वर्चस्व

रणजी सामन्याचा चौथा दिवस ठरणार निर्णायक

Akshay Nirmale

Ranji Cricket: सलामी फलंदाज डावखुरा ईशान गडेकर याने गुरुवारी रणजी क्रिकेट पदार्पणात शतक नोंदविण्याचा पराक्रम साधला. त्यामुळे गोव्याला केरळवर पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेणे शक्य झाले.

(Goa vs Kerala Ranji Match)

केरळमधील थुम्बा येथे सुरू असलेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर केरळने 6 गडी गमावून 172 धावा केल्या. त्यांच्यापाशी आता एकूण 126 धावांनी आघाडी आहे. पहिल्या डावातील शतकवीर रोहन प्रेम 68, तर जलज सक्सेना 28 धावांवर खेळत आहे. त्यांनी सातव्या विकेटसाठी 44 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. शुक्रवारी सामन्याचा चौथा आणि शेवटचा दिवस निर्णायक ठरू शकेल. गोव्याने केरळच्या पहिल्या डावातील 265 धावांना उत्तर देताना गुरुवारी उपाहाराच्या ठोक्याला सर्वबाद 311 धावा केल्या.

ईशान गडेकरने पदार्पण संस्मरणीय ठरविताना 200 चेंडूंत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. केरळचा फिरकी गोलंदाज जलज सक्सेना याने 103 धावांत 5 गडी बाद केले. मोसमात चौथ्यांदा त्याने अशी किमया साधली.

जबरदस्त फलंदाजी

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर बुधवारी 76 धावांवर नाबाद राहिलेल्या 25 वर्षीय ईशानने झोकात शतक पूर्ण केले. कर्णधार दर्शन मिसाळ व अर्जुन तेंडुलकर यांना गमावल्यानंतर गोव्याची स्थिती 7 बाद 229 अशी झाली. आघाडीचे लक्ष्य समोर असताना ईशान मोहित रेडकर याच्या समवेत टिच्चून खेळला. केरळचा फिरकी गोलंदाज जलज सक्सेना याला चौकारासाठी पिटाळत त्याने रणजी स्पर्धेतील पहिल्याच डावात शतक नोंदविण्याचा पराक्रम साधला. 197 चेंडूंत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने त्याने शतक पूर्ण केले. जलजने नंतर ईशानला बाद केले. त्यानंतर मोहित व शेवटचा गडी शुभम देसाई यांनी शेवटच्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी करत गोव्याला त्रिशतक पार करून दिले.

केरळची घसरगुंडी

केरळची दुसऱ्या डावात दमदार सुरवातीनंतर घसरगुंडी उडाली. मोहित रेडकर (3-56) व शुभम देसाई (2-26) हे ऑफस्पिनर त्यास कारणीभूत ठरले. रोहन प्रेम व राहुल पोन्नम यांची तिसऱ्या विकेटसाठीची 51 धावांची भागीदारी शुभम देसाईने रोखली. त्याने राहुलला त्रिफळाचीत बाद केले, त्यानंतर केरळने 16 धावांत 4 गडी गमावले, त्यापैकी तिघे जण सात धावांत बाद झाले. त्यामुळे केरळचा डाव 6 बाद 128 असा गडगडला. दिवसअखेर पहिल्या डावातील शतकवीर रोहन प्रेम व जलज सक्सेना यांनी यजमान संघाला सावरले.

संक्षिप्त धावफलक

केरळ, पहिला डाव ः 265 व दुसरा डाव ः 55 षटकांत 6 बाद 172 (रोहन कुन्नूम्मल 34, शॉन रॉजर 11, रोहन प्रेम नाबाद 68, राहुल पोन्नम 16, जलज सक्सेना नाबाद 28, लक्षय गर्ग 8-0-35-1, अर्जुन तेंडुलकर 3-0-10-0, दर्शन मिसाळ 10-1-38-0, मोहित रेडकर 19-4-56-3, शुभम देसाई 14-1-26-2, सिद्धेश लाड 1-1-0-0).

गोवा, पहिला डाव (5 बाद 200 वरून) ः 110.2 षटकांत सर्वबाद 311 (ईशान गडेकर 105, दर्शन मिसाळ 43, अर्जुन तेंडुलकर 6, मोहित रेडकर 37, लक्ष्य गर्ग 5, शुभम देसाई नाबाद 15, वैशाख चंद्रन 2-67, जलज सक्सेना 5-103, सिजोमॉन जोसेफ 3-51).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT