Kapil Dev Dainik Gomantak
क्रीडा

Kapil Dev Viral Video: कपिल देव यांचे अपहरण? गौतम गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ

Pranali Kodre

Gautam Gambhir shares Viral Video of Kapil Dev:

क्रीडा जगतात एकीकडे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु असताना आणि वनडे वर्ल्डकप तोंडावर आलेला असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव दिसत आहेत.

गौतम गंभीरने सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात दोन माणसे कपिल देव यांना धरून कुठेतरी नेत असल्याचे दिसत आहे. यावेळी कपिल देव यांचे तोंड बांधलेलेही दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावरील भाव घाबरल्याचे दिसत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गंभीरने त्यांचे अपहरण तर झाले नाही ना, अशा अर्थाचे कॅप्शन लिहिल्याने चाहते मात्र बुचकाळ्यात पडले आहेत. गंभीरने लिहिले आहे की कोणाला ही क्लिप मिळाली आहे का? आशा आहे की हे खरे नसावे आणि कपिल पाजी सुखरूप असावेत.'

दरम्यान, अनेक चाहत्यांनी असा कयास लावला आहे की हा व्हिडिओ एखाद्या जाहिरातीचा असेल. तर काही चाहत्यांनी अशा प्रकारे जर जाहिराती केल्या जात असतील, तर त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अद्याप या व्हिडिओबद्दल अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कपिल देव यांची कारकिर्द

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 साली वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. त्यावेळी भारताने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकले होते. कपिल देव हे भारताचे दिग्गज कर्णधार म्हणूनच नाही, तर उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणूनही गणले जातात. त्यांनी त्यांच्या अष्टपैलू खेळीने अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहेत.

कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत 131 कसोटी सामने खेळले असून 434 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 8 शतकांसह 5248 धावा केल्या आहेत. याशिवाय वनडेमध्ये त्यांनी 225 सामने खेळले असून 253 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 1 शतक आणि 14 अर्धशतकांसह 3783 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT