Ireland Head Coach resign Dainik Gomantak
क्रीडा

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Ireland Cricket Head Coach Heinrich Malan Resigns: 45 वर्षीय हेन्रिक मलान यांचा करार 2027च्या सुरुवातीपर्यंत होता, मात्र त्यांनी मुदतीपूर्वीच आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

Ireland Cricket Head Coach Resigns: आयर्लंड क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित बातमी समोर आली. आपल्या संघाला बलाढ्य भारतीय संघाविरुद्धच्या टी20 मालिकेत 2-0 असा विजय मिळवून दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात आयर्लंडचे मुख्य प्रशिक्षक हेन्रिक मलान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या जागी आता गॅरी विल्सन यांची आयर्लंडच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आयर्लंडच्या संघाने बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारतावर आयर्लंडचा हा पहिलाच ऐतिहासिक मालिका विजय ठरला.

45 वर्षीय हेन्रिक मलान यांचा करार 2027च्या सुरुवातीपर्यंत होता, मात्र त्यांनी मुदतीपूर्वीच आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट आयर्लंडने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाची पात्रता फेरी लक्षात घेता, नव्या प्रशिक्षकाकडे जबाबदारी सोपवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे मलान यांचे मत आहे. मलान यांची जानेवारी 2022 मध्ये तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती आणि 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.

हेन्रिक मलान यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्लंडच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्णकाळ अनुभवला आणि अनेक मोठे टप्पे पार केले. त्यांच्या कार्यकाळात संघाने 2022, 2024 आणि 2026 च्या टी20 विश्वचषकासाठी सलग तीन वेळा आपली जागा निश्चित केली. इतकेच नाही तर मलान यांच्या रणनीतीमुळेच आयर्लंडने जगातील सर्वात बलाढ्य संघांना धूळ चारली. 2022 च्या टी20 विश्वचषकात आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले होते, तर पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्यांनी संस्मरणीय विजय मिळवले.

कसोटी क्रिकेटमध्येही मलान यांचा कार्यकाळ आयर्लंडसाठी ऐतिहासिक ठरला. आयर्लंडने आपल्या क्रिकेट इतिहासातील तिन्ही कसोटी विजय मलान यांच्याच मार्गदर्शनाखाली मिळवले. यामध्ये अबू धाबीत अफगाणिस्तानला पराभूत करणे आणि बेलफास्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मायदेशातील पहिला कसोटी विजय नोंदवण्याचा समावेश आहे. भारतविरुद्धच्या (India) विजयानंतर मिळालेला हा धक्का पचवून, आयर्लंडचा संघ आता ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

Europe Heatwave: युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर! फ्रान्समध्ये 1000 हून अधिक मृत्यू; 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे परिस्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT