David Warner Dainik Gomantak
क्रीडा

Video: डेविड वॉर्नरवर चढलाय KGF 2चा स्वॅग, म्हणतोय वॉयलेन्स..वॉयलेन्स..वॉयलेन्स

वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे

दैनिक गोमन्तक

दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. आता यावेळी वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो KGF-2 चित्रपटातील 'Violence Violence' हा डायलॉग बॅटने दाखवत कॉपी करताना दिसत आहे. वॉर्नरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा' डायलॉग कोणत्या चित्रपटाचा आहे हे सांगू शकाल का?

वॉर्नर हॉलिवूड चित्रपटांपेक्षा बॉलीवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये जास्त रस दाखवतो. याआधीही अनेक टॉलिवूड आणि बॉलीवूड गाणी त्याने रिक्रिएट केली गेली आहेत किंवा त्यांचे डायलॉग कॉपी करताना दिसले आहेत. KGF Chapter 2 हा चित्रपट प्रशांत नील याने दिग्दर्शित केलेला एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. यात अभिनेता यशने उत्तम भूमिका साकारली आहे. 14 एप्रिल रोजी रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी, त्याने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.

डेव्हिड वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनेही वॉर्नरला विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवले.

वॉर्नर गेल्या मोसमात एसआरएचचा भाग होता

गेल्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात संघाच्या खराब कामगिरीनंतर वॉर्नरला सनरायझर्सचे कर्णधारपद गमवावे लागले होते. यानंतर व्यवस्थापनाने केन विल्यमसनला संघाचा कर्णधार बनवले. त्यावेळी टॉम मूडी आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात वाद होते. विल्यमसन देखील कर्णधारपदाखाली कोणताही करिष्मा दाखवू शकला नाही. वॉर्नरने 2021 वगळता सनरायझर्ससाठी प्रत्येक हंगामात 500 हून अधिक धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT