indian cricketers  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024 Auction: 'हे' 5 स्टार खेळाडू होऊ शकतात मालामाल; लिलावात सर्वच संघांची असणार नजर!

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मिनी लिलावाची क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

Manish Jadhav

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मिनी लिलावाची क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. हा लिलाव उद्या (19 डिसेंबर) दुबईत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात होत आहे. या लिलावात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. दरम्यान, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली होती. यावेळी हा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरु होईल. लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत. परदेशी खेळाडूंसाठी जास्तीत जास्त 30 सह 77 स्लॉट उपलब्ध आहेत.

शाहरुख खान (तामिळनाडू)

दरम्यान, 2023 च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा शाहरुख खान 2024 च्या हंगामापूर्वी रिलीज झाला. शाहरुखने आतापर्यंत 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 133.52 च्या स्ट्राइक रेटने 928 धावा केल्या आहेत. शाहरुख देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो.

कार्तिक त्यागी

कार्तिक त्यागीने अलीकडेच यूपी लीगमध्ये शानदार कामगिरी केली होती. या लीगमध्ये त्याने 5 सामन्यात 13 विकेट घेतल्या. या काळात कार्तिकने दोनदा हॅट्ट्रिक घेतली. यावरुन त्याच्या शानदार कामगिरीचा अंदाज लावता येतो. अशा परिस्थितीत लिलावात त्याच्यावर सर्वच संघांच्या नजरा असतील. त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी मोठी बोली लागेल. आयपीएल 2024 च्या लिलावात त्याला मोठी रक्कम मिळेल अशी शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळल्यानंतर या वेगवान गोलंदाजाला सनरायझर्स हैदराबादने 4 कोटी देत आपल्या संघात सामील करुन घेतले होते. तथापि, त्याने दोन हंगामात संघासाठी फक्त पाच सामने खेळले.

रमणदीप सिंग (पंजाब)

रमणदीप सिंग गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सच्या रोस्टरचा भाग होता. 2022 च्या हंगामात तो पाच सामने खेळला. या 26 वर्षीय खेळाडूने आपल्या मध्यम गती गोलंदाजीने सहा विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या तीन विकेट्सचा समावेश आहे. पंजाबच्या या अष्टपैलू खेळाडूने अलीकडेच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेतही आपला जलवा दाखवून दिला.

उर्विल पटेल (गुजरात)

उर्विल पटेलने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये चार सामन्यांमध्ये 311 धावा केल्या होत्या. यामध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 41 चेंडूंत शतक, लिस्ट ए क्रिकेटमधील भारतीयाचे दुसरे सर्वात जलद शतक होते. 25 वर्षीय उर्विल गुजरात टायटन्स संघाचा भाग होता, ज्याने 2023 च्या हंगामात उपविजेतेपद पटकावले होते.

विवरांत शर्मा (जम्मू आणि काश्मीर)

जम्मूचा स्टार क्रिकेटर विवरांत शर्माला या लिलावात चांगली रक्कम मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये 3 सामने खेळले आहेत. त्याने 2023 मध्ये पदार्पण केले. विवरांतने 17 टी-20 सामन्यात 309 धावा केल्या आहेत. तसेच, या कालावधीत 8 विकेट्सही घेतल्या. त्याने 22 लिस्ट ए सामन्यात 837 धावा केल्या आहेत. यासह 10 विकेट्स घेतल्या. विवरांतचा प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही चांगला रेकॉर्ड आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने 2.20 कोटी देत आपल्या संघात सामील करुन घेतल्यानंतर विवरांत शर्मा चर्चेत आला होता. 2023 IPL लिलावादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सनेही बोली लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT