Sunrisers Hyderabad Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 च्या लिलावातच मोठा खुलासा, 'हा' खतरनाक खेळाडू होणार हैदराबादचा नवा कर्णधार!

IPL Auction 2023: आयपीएल 2023 च्या लिलावातच मोठा खुलासा झाला आहे. वास्तविक, सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार कोण होणार हे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

IPL Auction 2023: आयपीएल 2023 च्या लिलावातच मोठा खुलासा झाला आहे. वास्तविक, सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार कोण होणार हे समोर आले आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे संकेत सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा यांनी दिले आहेत. शुक्रवारी आयपीएल 2023 च्या लिलावादरम्यान ब्रायन लारा सलामीवीर मयंक अग्रवालला खरेदी करताना आनंदी होते.

हा खतरनाक खेळाडू होणार हैदराबादचा नवा कर्णधार!

कोची येथे आयपीएल 2023 च्या लिलावाच्या पहिल्या ब्रेक दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा म्हणाले की, "व्यक्तिशः मला वाटते की, मयंक अग्रवाल कर्णधार होण्यासाठी योग्य आहे, परंतु संघात इतर खेळाडू देखील आहेत."

दुसरीकडे, मयंक अग्रवाल आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जच्या कर्णधारपदासह बॅटने चमत्कार करु शकला नाही. मयंकने 13 सामन्यांत 16.33 च्या सरासरीने फक्त 196 धावा केल्या होत्या. त्यावेळी पंजाब दहा संघांच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहीला होता. नोव्हेंबरमध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) पंजाब किंग्जचा नवा कर्णधार म्हणून घोषित केल्यानंतर, मंयकला संघाने सोडले होते.

IPL 2023 च्या लिलावातच मोठा खुलासा झाला

हैदराबादने या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकलाही विकत घेतले. 17 डावांमध्ये 137.77 च्या स्ट्राइक रेटने त्याची सरासरी 26.57 होती. ऑस्ट्रेलियात इंग्लंडच्या (England) T20 विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT