RR New Captain Dainik Gomantak
क्रीडा

RR New Captain: राजस्थानने भाकरी फिरवली, नवीन कर्णधाराची घोषणा; 'या' युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी

IPL 2026: आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत.

Sameer Amunekar

Rajasthan Royals New Captain : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. संघाचा दीर्घकाळचा कर्णधार संजू सॅमसन याने फ्रँचायझीची साथ सोडली असून तो आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळताना दिसेल. सॅमसनच्या जागी राजस्थान रॉयल्सने युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग याच्यावर विश्वास दाखवत त्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचे निश्चित केले आहे.

संजू सॅमसनची चेन्नईत 'एन्ट्री' अन् मोठा ट्रेड

गेल्या ११ हंगामांपासून राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजू सॅमसनने गेल्या हंगामानंतर संघ सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, राजस्थानने संजूला चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रेड केले आहे. या बदल्यात चेन्नईने त्यांचे दोन स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सकडे सोपवले आहे. या मेगा ट्रेडमुळे दोन्ही संघांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

रियान पराग: कर्णधारपदासाठी संगकाराची पसंती

२४ वर्षीय रियान परागने यापूर्वी सॅमसनच्या अनुपस्थितीत ८ सामन्यांत राजस्थानचे नेतृत्व केले आहे. जरी त्यापैकी केवळ २ सामने संघ जिंकला असला, तरी परागची वैयक्तिक कामगिरी चमकदार होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ९५ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी अनेक खेळाडूंच्या मुलाखती घेतल्यावर परागच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. २०२४ चा हंगाम परागसाठी ऐतिहासिक ठरला होता, ज्यामध्ये त्याने ५२.०९ च्या सरासरीने ५७३ धावा कुटल्या होत्या.

नवा कर्णधार, नवा प्रशिक्षक अन् नवीन रणनीती

२०२५ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून संघ गुणतालिकेत खालून दुसऱ्या क्रमांकावर होता. या अपयशानंतर राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. आता नव्या हंगामात राजस्थानचा संघ नवीन कर्णधार (रियान पराग) आणि नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT