RR beat PBKS by 6 wickets Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: "राजस्थाननं रोखला पंजाबचा विजयरथ!" गुणतालिकेत 'टॉप-3' मध्ये रॉयल एन्ट्री; हैदराबादची पीछेहाट

RR beat PBKS by 6 wickets: आयपीएल 2026 च्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव करत यंदाच्या हंगामातील आपला दबदबा कायम राखला.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table: आयपीएल 2026 च्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव करत यंदाच्या हंगामातील आपला दबदबा कायम राखला. मुल्लांपूरच्या मैदानावर झालेल्या या हाय-व्होल्टेज लढतीत पंजाबने विजयासाठी ठेवलेले 223 धावांचे विशाल लक्ष्य राजस्थानने अवघ्या 19.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 228 धावा कुटून साध्य केले. राजस्थानच्या या विजयामुळे आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली असून पंजाबला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 बाद 222 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, राजस्थानच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत हे लक्ष्य सहज पार केले. या विजयासह रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने 9 सामन्यांत 6 विजय मिळवून 12 गुणांसह गुणतालिकेत थेट तिसरे स्थान गाठले. राजस्थानच्या या झेपमुळे सनरायझर्स हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली.

हैदराबादच्या खात्यात 8 सामन्यांत 5 विजयांसह 10 गुण आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्सला या हंगामात पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पाहावे लागले असले तरी, 13 गुणांसह ते अजूनही गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहेत. पंजाबचा नेट रनरेट (+1.043) अत्यंत चांगला असल्याने त्यांचे अव्वल स्थान अबाधित राहिले.

गुणतालिकेतील इतर संघांचा विचार करता, गुजरात टायटन्स 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर खालच्या फळीतील संघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स सहाव्या आणि दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर असून दोघांच्या खात्यात प्रत्येकी 6 गुण आहेत, मात्र सरस धावगतीच्या जोरावर चेन्नई पुढे आहे. कोलकाता नाईट रायडर्स 5 गुणांसह आठव्या आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 4 गुणांसह नवव्या स्थानावर चाचपडत आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सची अवस्था अत्यंत वाईट असून 4 गुण आणि उणे 1.106 च्या नेट रनरेटसह ते गुणतालिकेत सर्वात तळाला म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहेत. राजस्थानच्या या विजयाने प्ले-ऑफची शर्यत अधिकच रंजक बनवली असून आगामी सामने गुणतालिकेचे चित्र पूर्णपणे पालटवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT