Rajasthan Royals  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

Rajasthan Royals Top of Points Table 8 Points: आयपीएल 2026च्या रोमांचक लढतीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत मोठी उलथापालथ घडवून आणली.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table Standings Latest: आयपीएल 2026च्या रोमांचक लढतीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत मोठी उलथापालथ घडवून आणली. राजस्थानच्या संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत बंगळुरुचे 201 धावांचे आव्हान 18व्या षटकातच पूर्ण केले. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ आता गुणतालिकेत सर्वात वरच्या स्थानी पोहोचला असून बंगळुरुच्या पराभवाचा थेट फायदा पंजाब किंग्सला झाला.

सामन्याचा आढावा घेतल्यास, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा आव्हानात्मक पल्ला गाठला होता. मात्र, राजस्थानच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत हे लक्ष्य अत्यंत सोप्या पद्धतीने गाठले. या विजयासह राजस्थान रॉयल्सने चालू हंगामात विजयाचा चौकार मारला असून, सलग चार विजयांमुळे त्यांचे 8 गुण झाले आहेत. 8 गुणांसह राजस्थान आता दिमाखात अव्वल स्थानी विराजमान आहे. दुसरीकडे, या पराभवाचा मोठा फटका आरसीबीला बसला असून, त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. आरसीबीच्या पराभवामुळे 5 गुण असलेल्या पंजाब किंग्सच्या संघाला फायदा झाला असून, ते आता दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

गुणतालिकेतील इतर संघाचा विचार करता, दिल्ली कॅपिटल्स चौथ्या तर लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद सहाव्या आणि गुजरात टायटन्स सातव्या क्रमांकावर स्थिर आहेत. मात्र, आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी मानले जाणारे तीन संघ मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यासाठी हा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या तीन संघांनी मिळून आयपीएलचे 18 पैकी 13 हंगाम जिंकले आहेत, ते सर्व संघ सध्या गुणतालिकेत तळाला आहेत. मुंबई इंडियन्स 8व्या, कोलकाता नाईट रायडर्स 9व्या तर गतविजेत्यांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ 10व्या स्थानी आहे.

राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) या विजयाने स्पर्धेत एक नवा उत्साह निर्माण केला असून बड्या संघांच्या खराब कामगिरीमुळे प्ले-ऑफची शर्यत अधिक रंजक झाली आहे. विशेषतः राजस्थानचा फॉर्म पाहता, त्यांना रोखणे इतर संघांसाठी कठीण जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाब किंग्ससाठी आरसीबीचा पराभव ही 'लॉटरी' ठरली असून आता अव्वल दोनमध्ये स्थान टिकवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. गुणतालिकेतील हे बदल आगामी सामन्यांमधील चुरस आणखी वाढवणारे ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT