MI vs KKR Dainik Gomantak
क्रीडा

MI vs KKR: मुंबई इंडियन्सची 'फर्स्ट मॅच' देवाला? वानखेडेवर कोलकाताविरुद्ध रंगणार 'हायव्होल्टेज' थरार

IPL 2026: आयपीएल २०२६ च्या १६ व्या हंगामाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, रविवारी २९ मार्च रोजी क्रिकेट चाहत्यांना एक ब्लॉकबस्टर लढत पाहायला मिळणार आहे.

Sameer Amunekar

मुंबई: आयपीएल २०२६ च्या १६ व्या हंगामाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, रविवारी २९ मार्च रोजी क्रिकेट चाहत्यांना एक ब्लॉकबस्टर लढत पाहायला मिळणार आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स (MI) संघ आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध भिडणार आहे. गेल्या दोन हंगामात मुंबईची पाटी कोरीच राहिली असून, दुसरीकडे तीनवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआरसाठीही मागचा काळ विसरण्याजोगा होता. त्यामुळे या दोन्ही संघाना विजयाने सुरुवात करून आपले जुने वर्चस्व पुन्हा मिळवण्याची मोठी संधी आहे.

वानखेडेवर मुंबईचा 'किंग' मेकर दरारा

इतिहास पाहिला तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केकेआरची अवस्था नेहमीच बिकट राहिली आहे. या मैदानावर आतापर्यंत दोन्ही संघांत १२ सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी १० सामन्यांत मुंबईने बाजी मारली आहे, तर कोलकात्याला केवळ २ वेळा विजय मिळवता आला आहे. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि खेळपट्टीचा अंदाज पाहता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे पारडे जड मानले जात आहे.

फलंदाजांसाठी नंदनवन की गोलंदाजांची कसरत?

वानखेडेची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर ठरली आहे. मैदानाची बाउंड्री लहान असल्याने येथे चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. सुरुवातीच्या काही षटकांत वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, मात्र सामना जसजसा पुढे जाईल तशी दव (Dew) निर्णायक भूमिका बजावेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण जात असल्याने, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. या मैदानावर चाहत्यांना २०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा राहिलेला पाहायला मिळू शकतो.

कधी, कुठे आणि कसं पाहाल लाईव्ह प्रक्षेपण?

हा रोमांचक सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७:०० वाजता होईल. टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्क उपलब्ध आहे. जर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहायचे असेल, तर तुम्ही जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) वर लॉग इन करून या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT