Priyansh Arya Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "मैदानात षटकार, स्टँड्समध्ये हाहाकार!" प्रियांश आर्याच्या शॉटनं चाहता जखमी; रक्तानं माखलेला व्हिडिओ व्हायरल

Priyansh Arya Shot Hits Fan Face: पंजाब किंग्सच्या फलंदाजीदरम्यान एका चाहत्याला चेंडू थेट चेहऱ्यावर लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Manish Jadhav

Fan Injured in IPL 2026 Stadium: आयपीएल 2026 चा 40 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मुल्लांपूरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने पंजाबला पराभवाची धूळ चारली असली, तरी एका दुर्दैवी घटनेने या विजयाच्या आनंदावर विरजण पडले. पंजाब किंग्सच्या फलंदाजीदरम्यान एका चाहत्याला चेंडू थेट तोंडावर लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून क्रिकेटच्या मैदानातील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.

ही घटना पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) डावाच्या सुरुवातीला घडली. सलामीवीर प्रियांश आर्या मैदानात फटकेबाजी करत होता. एका चेंडूवर प्रियांशने अत्यंत जोरात फटका मारला आणि चेंडू थेट स्टँड्समध्ये गेला. दुर्दैवाने, हा वेगवान चेंडू तिथे सामना पाहणाऱ्या एका चाहत्याच्या थेट तोंडावर लागला. चेंडूचा वेग इतका जास्त होता की, त्या चाहत्याच्या चेहऱ्यातून क्षणात रक्ताच्या धारा वाहू लागल्या. जखमी झालेला चाहता पंजाब किंग्सचा चाहता असल्याचे दिसत असून त्याच्या हातात संघाचा झेंडा होता.

त्याचवेळी, आजूबाजूला बसलेल्या प्रेक्षकांनी तातडीने त्या चाहत्याला घेरले आणि प्राथमिक मदतीसाठी प्रयत्न केले. प्रियांश आर्याने या सामन्यात 11 चेंडूत 29 धावांची छोटी पण आक्रमक खेळी खेळली, मात्र त्याच्या एका शॉटने चाहत्याला दवाखान्याची पायरी चढायला लावली.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, राजस्थान रॉयल्सने या हंगामात अजिंक्य असलेल्या पंजाब किंग्सचा विजयरथ रोखला. पंजाबने विजयासाठी ठेवलेले 223 धावांचे अवाढव्य लक्ष्य राजस्थानने 4 चेंडू राखून पूर्ण केले. राजस्थानच्या विजयात वैभव सूर्यवंशीचा मोठा वाटा राहिला, त्याने अवघ्या 16 चेंडूत 43 धावांची वादळी खेळी खेळली. त्यानंतर डोनोवन फरेरा आणि शुभम दुबे यांनी 32 चेंडूत 77 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. फरेराला त्याच्या आक्रमक अर्धशतकासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानने या विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली, तर दुसरीकडे जखमी चाहत्याच्या प्रकृतीसाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT