BCCI bans smart glasses Dainik Gomantak
क्रीडा

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

BCCI PMOA Restricted Area Rules: आयपीएलच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा विभागाने खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफसाठी एक अत्यंत कडक मार्गदर्शक सूचना जारी केली.

Manish Jadhav

IPL 2026 Smart Glasses Ban: आयपीएल 2026 चा अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी आयपीएलच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा विभागाने खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफसाठी एक अत्यंत कडक मार्गदर्शक सूचना जारी केली. एसीएसयूने सामन्याच्या दिवशी स्टेडियममधील प्रतिबंधित क्षेत्राच्या आत स्मार्ट ग्लास, स्मार्ट सनग्लास आणि ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा कम्युनिकेशन फीचर्स असलेल्या कोणत्याही गॉगलच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली.

क्रिकेटमधील स्पॉट फिक्सिंग आणि अनधिकृत संवादाचा धोका कमी करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणांनी आता आपली पाळत आणि कडकपणा अधिक वाढवला.

'द इंडियन एक्सप्रेस'च्या अहवालानुसार, अनेक कंपन्या आयपीएल खेळाडूंना आणि टीम स्टाफला 'स्मार्ट आयवेअर' उपकरणांची विक्री आणि प्रसिद्धी करत असल्याची माहिती एसीएसयूने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली. या आधुनिक चश्म्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, टेक्स्ट मेसेज पाठवणे-स्वीकारणे आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग करणे सहज शक्य आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची भीती वाढली. सूत्रांच्या माहितीनुसार, एसीएसयूने या उपकरणांना 'ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइस' आणि 'कम्युनिकेशन इक्विपमेंट'च्या श्रेणीत टाकून त्यावर तात्काळ बंदी आणली.

आयपीएलच्या (IPL) प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरियाच्या नियमांनुसार, आता अशा कोणत्याही तांत्रिक उपकरणाला प्रतिबंधित क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई असेल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्पष्ट निर्देश देण्यात आले की, सामन्याच्या दिवशी या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपले स्मार्ट चष्मे, मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच सुरक्षा संपर्क अधिकाऱ्याकडे जमा करणे बंधनकारक राहील. या नियमाचे पालन न केल्यास तो नियमांचा भंग मानला जाईल आणि संबंधित व्यक्तीवर मोठा दंड किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. वेअरेबल टेक्नॉलॉजीचा वाढता प्रभाव आणि गुप्त संवादाचे धोके पाहता बीसीसीआयने आयपीएलची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

याआधीही आयपीएल 2026 च्या चालू हंगामात तंत्रज्ञान आणि शिस्तीशी संबंधित मोठे वाद समोर आले आहेत. राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर यांना डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना पकडण्यात आले होते, ज्यासाठी त्यांना 1 लाख रुपयांचा दंड आणि कडक चेतावणी देण्यात आली होती. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग देखील पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगरेट वापरताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. या गैरवर्तनासाठी त्याच्यावर सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला होता आणि एक डिमेरिट पॉईंटही देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता अंतिम सामन्यापूर्वी सुरक्षेच्या नियमात मोठी वाढ करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT