RCB Wins IPL 2025 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2025 Final: अखेर विराटचं स्वप्न पूर्ण!! पंजाबवर 6 धावांनी मात करत रॉयल चॅलेंजर्सचा पहिला-वाहिला विजय

RCB IPL Win 2025: विराट कोहलीसोबत आणि त्याच्या भलमोठ्या चाहत्यावर्गासाठी अखेर विजेतेपद मिरवण्याचा दिवस आला आहे.

Akshata Chhatre

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने इतिहास रचला आहे. मंगळवार (दि.३ जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करत आरसीबीने आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीने अखेर ही प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. विराट कोहलीसोबत आणि त्याच्या भलमोठ्या चाहत्यावर्गासाठी अखेर विजेतेपद मिरवण्याचा दिवस आला आहे.

सामन्यात आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या. आरसीबीकडून टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं लक्ष्य उभं केलं होतं. परंतु पंजाब किंग्जच्या फलंदाजांना हे लक्ष्य पार करता आलं नाही.

सामन्यात आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या. आरसीबीकडून टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं लक्ष्य उभं केलं होतं. परंतु पंजाब किंग्जच्या फलंदाजांना हे लक्ष्य पार करता आलं नाही.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पॉवर प्लेमध्ये २ विकेट गमावल्या. आरसीबीकडून फिल सॉल्ट १६ (९) धावांवर बाद झाला. मयंक अग्रवाल २४ (१८) धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रजत पाटीदार २६ (१६), लियाम लिव्हिंगस्टोन २५ (१५), जितेश शर्मा २४ (१०), रोमानियो शेफर्ड १७ (८) धावांवर बाद झाला.

कृणाल पंड्या ४ धावा काढून बाद झाला आणि भुवनेश्वर कुमार १ धाव काढून बाद झाला. पंजाबच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना टिकू दिले नाही, परिणामी आरसीबीनं ९ विकेट गमावल्या. अशाप्रकारे, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ९ विकेट गमावून १९० धावा केल्या होत्या.

यानंतर पंजाबच्या खेळाडूंनी देखील जोर कायम ठेवला मात्र ते आरसीबीच्या फलंदाजांसार टिकू शकले नाहीत. आरसीबीकडून कृणाल पंड्या आणि भुवनेश्वर कुमारने क्रमशः २-२ तर जोश हेझलवूड आणि रोमॅरिओ शेपर्ड, यश दयाल यांनी प्रत्येकी एक व्हीकेट मिळवली आणि सामना पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात आणला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना जिंकला ६ धावांनी जिंकला आहे.

मागील अनेक हंगामांपासून आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते, पण अंतिम फेरीत त्यांना अनेकदा पराभव पत्करावा लागला होता. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व अडथळे पार करत जेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे बंगळूरु शहरात आणि जगभरातील आरसीबीच्या कोट्यवधी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस या दिग्गजांनीही न जमलेली कामगिरी रजत पाटीदारने करून दाखवल्याने त्याच्या नेतृत्वाची आणि संघाच्या कामगिरीची प्रशंसा केली जात आहे. हा विजय केवळ आरसीबीसाठीच नव्हे, तर आयपीएलच्या इतिहासातही एक नवा अध्याय लिहून गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT