IPL Auction 2023
IPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024: तयारी लिलावाची! चेन्नई, मुंबई, बेंगलोरसह 10 संघांनी कोणत्या खेळाडूंना केले रिलीज, पाहा यादी

Pranali Kodre

IPL 2024 Retention:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान या हंगामाचा लिलाव होण्यापूर्वी 26 नोव्हेंबर सर्व फ्रँचायझींना संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख होती. त्यानुसार आता सर्व संघांची नावे समोर आली आहेत.

फ्रँचायझींनी अनेक मोठ्या खेळाडूंना मुक्त करत आपल्या पर्समध्ये मोठी रक्कम लिलावासाठी शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. सर्व संघांनी मिळून 173 खेळाडू कायम केले आहेत. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 19 डिसेंबर रोजी दुबईला लिलाव होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्स संघाची सर्वात प्रथम नावे समोर आली आहेत. चेन्नईने बेन स्टोक्स, ड्वेन प्रीटोरियस, अंबाती रायुडू, सिसांडा मगला, काईल जेमिसन, भगत वर्मा, सुभ्रांशू सेनापती आणि आकाश सिंग या खेळाडूंना लिलावापूर्वी संघातून मुक्त केले आहे. तसेच अंबाती रायुडू निवृत्त झाल्याने तो देखील या संघाचा भाग नसेल.

चेन्नई सुपर किंग्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 31.4 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, दीपक चाहर, महिश तिक्षणा, मुकेश चौधरी, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगारगेकर, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स संघाने 11 खेळाडूंना मुक्त केले आहे. यामध्ये रिली रोसौ, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनिष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजूर रेहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सर्फराज खान, अमन खान आणि प्रियम गर्ग यांचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 28.95 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - अभिषेक पोरेल, एन्रिच नॉर्किया, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगीसानी एन्गिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुल

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जो रुटने आयपीएल 2024 स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो देखील संघातून मुक्त झाला आहे. त्याच्याशिवाय राजस्थानने अब्दुल बासिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेड मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा आणि केएम असिफ या खेळाडूंना मुक्त केले आहे.

तसेच देवदत्त पडिक्कलला राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्सबरोबर आवेश खानच्या बदल्यात ट्रेड केले आहे.

राजस्थान रॉयल्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 14.5 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - ऍडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठोड, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जयस्वाल, युझवेंद्र चहल

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी अनेक मोठ्या खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

कोलकाताने शाकिब अल हसन, लिटन दास, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, आर्या देसाई, डेव्हिड विसे, एन जगदिशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, जोनासन चार्ल्स या खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 32.7 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमनुल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नारायण, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादलने लिलावापूर्वी केवळ 6 खेळाडूंना मुक्त केले आहे. यामध्ये हॅरी ब्रुक हे मोठे नाव आहे. गेल्यावर्षी हैदराबादने त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजली होती.

हैदराबादने आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी हॅरी ब्रुक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, एकिल हुसैन आणि आदील राशिद यांना मुक्त केले आहे.

तसेच हैदराबादलने मयंक डागरला रॉयल चॅलेंजर्स बरोबर शाहबाज अहमदच्या बदल्यात ट्रेड केले आहे.

सनरायझर्स हैदराबादकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 34 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेन्रिक क्लासेन, मार्को यान्सिन, मयंक अगरवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद (ट्रेड), टी.नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की ते कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड करणार आहे. मात्र आता गुजरातने त्याला आयपीएल 2024 लिलावापूर्वी संघात कायम केल्याचे समजत आहे. त्यामुळे तो आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरातकडूनच खेळताना दिसू शकतो.

गुजरातने यश दयाल, केएल भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदिव सांगवान, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दसून शनका यांना संघातून मुक्त केले आहे.

गुजरात टायटन्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 23.15 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विलियम्सन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटील, मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सने 11 खेळाडूंना आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मुक्त केले आहे. यामध्ये अनेक मोठ्या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

मुंबईने मोहम्मद आर्शद खान, रमनदीप सिंग, हृतिक शोकिन, राखव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, ड्युआन यान्सिन, झाय रिचर्डसन, रिली मेरिडीथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर या खेळाडूंना मुक्त केले आहे.

मुंबई इंडियन्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 15.25 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरॉन ग्रीन, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, विष्णू विनोद

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने वनिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, मायकल ब्रेसवेल यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आयपीएल 2024 लिलावापूर्वी मुक्त केले आहे.

याशिवाय बेंगलोरने हर्षल पटेल, फिन ऍलेन, डेव्हिड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव या खेळाडूंनाही संघातून मुक्त केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 40.75 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोप्ली, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, वैशाख विजय कुमार, विल जॅक्स

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी 8 खेळाडूंनाच मुक्त केले आहे. त्यामुळे त्याचे प्रमुख खेळाडू संघात कायम खेळताना दिसणार आहेत.

लखनऊने जयदेव उनाडकट, डॅनिएल सॅम्स, मनन वोहरा, स्वप्निल सिंग, करण शर्मा, अर्पित गुलेरिया, सुर्यांश शेडगे, करुण नायर या खेळाडूंना मुक्त केले आहे. तसेच लखनऊने रोमारियो शेफर्डला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड केले आहे.

लखनऊ सुपर जायंट्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 13.15 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल (ट्रेड), के. गॉथम, केएल राहुल, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक

पंजाब किंग्स

आयपीएल 2024 लिलावापूर्वी पंजाबने केवळ पाच खेळाडूंनाच मुक्त केले आहे. यात शाहरुख खान या खेळाडूचेही नाव असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. शाहरुखची गेल्यावर्षी समाधानकारक कामगिरी होती.

पंजाबने शाहरुख व्यतिरिक्त भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धंदा आणि राज अंगद बावा यांनाही मुक्त केले आहे.

पंजाब किंग्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 29.1 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

  • संघात कायम केलेले खेळाडू - अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चाहर, ऋषी धवन, सॅम करन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, विद्वथ कावरप्पा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लय अवघड गड्या उमगाया बाप रं...! वडिलांनी मूत्रपिंड देऊन मुलाला दिलं नवजीवन; ‘गोमेकॉ’त यशस्वी शस्त्रक्रिया

Panjim News: खाडीतील पाणीसुद्धा गटारांतून रस्‍त्‍यावर; पाटो परिसराची डोकेदुखी

Domestic Cricket Season Schedule: टी-20 अन् वनडे क्रिकेटचा रंगणार थरार; गोव्याच्या महिलांची ऑक्टोबरपासून 'मोहीम'

हृदयविकाराच्या दुर्मिळ आजाराने जन्माला आले बाळ, 300 मिनिटांत बंगळुरुला एअरलिफ्ट करुन दिला दुसरा जन्म

Goa Today's News Live: दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

SCROLL FOR NEXT