Jason Roy  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024 पूर्वी KKR ला मोठा झटका! संपूर्ण हंगामातून 'हा' धकाडेबाज खेळाडू आऊट; फिल सॉल्टची संघात एन्ट्री

Kolkata Knight Riders: आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत.

Manish Jadhav

Kolkata Knight Riders: आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, एका संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघाचा एक स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझीला या खेळाडूच्या रिप्लेसमेंटची घोषणा करावी लागली आहे.

हा खेळाडू आयपीएल 2024 मधून बाहेर

दरम्यान, आयपीएल 2024 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू जेसन रॉय या हंगामातून बाहेर पडला आहे. रॉयने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात जेसन रॉय बदली खेळाडू म्हणून संघात सामील झाला होता. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी जेसन रॉयचा संघात समावेश करण्यात आला होता.

या स्टार खेळाडूची KKR मध्ये एन्ट्री

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने जेसन रॉयच्या जागी फिल सॉल्टचा संघात समावेश केला आहे. फिल सॉल्ट गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, परंतु यावेळी तो लिलावात न विकला गेला. पण आता तो आयपीएलमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 1.5 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्टची अलीकडची कामगिरी चांगलीच झाली आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दोन टी-20 शतके झळकावली होती.

IPL 2024 साठी KKR चा संघ

नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, आंग्रेश राणा, आंद्रे राणा, श्रीकर भारत, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT