MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 व्ह्युवरशीपबाबत धोनीनं मोडला स्वत:चाच रेकॉर्ड, फलंदाजीला उतरताच गाठली नवी उंची

धोनी 1426 दिवसांनी चेन्नईत फलंदाजीला उतरल्यानंतर IPL 2023 व्ह्युवरशीपनं नवा विक्रम केला.

Pranali Kodre

IPL Viewership: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याचा चाहतावर्ग पाहायला मिळतो. तो ज्या मैदानात खेळताना दिसतो, तिथे हजारो चाहते त्याला पाठिंबा देताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतही त्याच्याबद्दल चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ दिसून आली आहे.

सध्या अशी चर्चा आहे की आयपीएल २०२३ धोनीचा अखेरचा हंगाम आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये अनेक चाहते त्याला पाहाण्यासाठी येत असल्याचेही दिसून आले आहे. इतकेच नाही, तर तो फलंदाजीला आल्यानंतर टीव्ही आणि ऑनलाईन व्ह्युवरशीपमध्येही वाढ झाल्याचे दिसले आहे.

महत्त्वाचे म्हणजे धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे आत्तापर्यंत आयपीएल २०२३ मध्ये दोनच सामने झाले आहेत. पण या दोन्ही सामन्यात धोनीच्या फलंदाजीवेळी जियो सिनामावरील व्ह्युवरशीपने नवी उंची गाठली आहे. आयपीएल २०२३ चे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर होत आहे.

सीएसकेने पहिला सामना गुजरात टायटन्स संघात खेळला होता. या सामन्यात धोनीने नाबाद १४ धावा केल्या होत्या. सामन्यात धोनी फलंदाजीला आल्यानंतर जियो सिनेमावरील व्ह्युवरशीपने १.६ कोटीचा आकडा गाठला होता.

तर सोमवारी (३ एप्रिल) झालेल्या सीएसके विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यादरम्यान धोनीच्या फलंदाजीवेळी व्ह्युवरशीपने १.७ कोटींचा आकडा गाठला. म्हणजेच जवळपास १.७ कोटी युजर्स धोनी फलंदाजी करत असताना जियो सिनेमावर सामना पाहात होते. हा आयपीएल २०२३ मधील आत्तापर्यंतचा सर्वोच्च व्ह्युवरशीपचा आकडा आहे.

धोनी सोमवारी झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर ८ व्या क्रमांकावर २० व्या षटकात फलंदाजीला आला होता. त्याने फलंदाजीला आल्यानंतर मार्क वूडच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूंवर दोन सलग षटकार मारले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईकडे झेल देत बाद झाला.

विशेष गोष्ट अशी की सीएसके जवळपास चार वर्षांनंतर एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना खेळत होते. त्यामुळे चेन्नईतील चाहत्यांना धोनीला तब्बल १४२६ दिवसांनी फलंदाजी करताना प्रत्यक्ष पाहाता आळे. यापूर्वी सीएसके मे २०१९ मध्ये अखेरचा सामना या स्टेडियमवर खेळले होते.

या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला होता. यात धोनीच्या दोन षटकारांचाही महत्वाचा वाटा ठरला. तसेच सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली, तर डेव्हॉन कॉनवेने ४७ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून सलामीला ११० धावांची भागीदारी रचली होती.

लखनऊला २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात ७ बाद २०५ धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT