Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबच्या सेनापतीचा 'वन मॅन शो'! धवन @99 नॉटआऊट, 'या' खेळाडूंही केलाय असा अनोखा विक्रम

रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन 99 धावांवर नाबाद राहिला.

Pranali Kodre

Shikhar Dhawan not out 99 runs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) पार पडले. या दिवसातील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यात हैदराबादने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला. मात्र पंजाबचा कर्णधार शिखर धवनने दिलेल्या एकाकी लढतीने सर्वांचे लक्ष वेधले.

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाबचा संघ फलंदाजीला उतरला. मात्र, सलामीला खेळायला आलेला शिखर धवन एका बाजूने भक्कमपणे खेळत असताना दुसऱ्या बाजूने पंजाबच्या खेळाडूंनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्याला सॅम करनने 22 धावा करून साथ दिली. पण तोही फार काळ टिकू शकला नाही.

अखेर शेवटच्या विकेटसाठी शिखरने मोहित राठीला साथीला घेत 50 धावांनी नाबाद भागीदारी साकारली. त्यामुळे पंजाबला 20 षटकात 9 बाद 143 धावा करता आल्या. मात्र शिखरचे तिसरे आयपीएल शतक केवळ एका धावेने हुकले. अखेरच्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी शिखर 91 धावांवर नाबाद होता.

पण 20व्या षटकात टी नटराजनने शिखरला पहिल्या पाचही चेंडूत मोठा फटका खेळण्यापासून रोखले. अखेरच्या चेंडूवर मात्र शिखरने षटकार ठोकला. पण त्याच्या एकूण 99 धावाच झाल्या. त्यामुळे त्याला 66 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांसह 99 धावांवर नाबाद राहावे लागले.

आयपीएलमध्ये 99 धावांवर नाबाद राहणारे फलंदाज

दरम्यान, शिखर आयपीएलमध्ये 99 धावांवर नाबाद राहाणारा चौथाच फलंदाज आहे. यापूर्वी असा विक्रम सुरेश रैना, ख्रिस गेल आणि मयंक अगरवाल यांच्या नावावरही नोंदवला गेला आहे. रैना 2013 आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 99 धावांवर नाबाद राहिला होता.

तसेच ख्रिस केल पंजाब किंग्सकडून आयपीएल 2019 हंगामात खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 99 धावांवर नाबाद राहिला होता. तसेच 2021 आयपीएलमध्ये मयंक अगरवाल पंजाब किंग्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 99 धावांवर नाबाद राहिला होता.

हैदराबादने जिंकला सामना

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने दिलेल्या 144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 2 विकेट्स गमावत 18 व्या षटकाच्या आतच सहज पूर्ण केला. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 74 धावांची नाबाद खेळी केली. ही खेळी त्याने 48 चेंडूत 10 चौकार आणि ३ षटकार ठोकत केली. तसेच कर्णधार एडेन मार्करमने 37 धावांची नाबाद खेळी केली, तर सलामीवीर मयंक अगरवालने 21 आणि हॅरी ब्रुकने १३ धावा केल्या.

दरम्यान, हैदराबादच्या गोलंदाजांनीही या सामन्यात चांगली कामगिरी केली. हैदराबादकडून मयंक मार्कंडेने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली.

विशेष म्हणजे हा सामना हैदराबादचा संघ जिंकला असला, तरी सामनावीराचा पुरस्कार शिखर धवनला देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT