Ravi Shastri Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'हा' धाकड मोडू शकतो कोहलीचा 973 धावांचा रेकॉर्ड, रवी शास्त्रींचा मोठा दावा

IPL 2023: आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर असा विक्रम आहे, जो भल्या-भल्या फलंदाजांसाठी स्वप्नवत आहे.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर असा विक्रम आहे, जो भल्या-भल्या फलंदाजांसाठी स्वप्नवत आहे.

आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्यात कोहली अव्वल स्थानावर आहे. IPL 2016 मध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने 973 धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले होते.

या कालावधीत त्याने 4 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली होती. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही, अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्याने आरसीबीला विजेतेपदापर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला होता. जरी त्याचा विक्रम आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने मोडला नाही.

शुभमन गिल हा विक्रम मोडू शकतो

दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मते, कोहलीचा विक्रम मोडण्याचे काम शुभमन गिलशिवाय दुसरे कोणी करु शकत नाही. गिल गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. स्टार स्पोर्ट्सवरील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान बोलताना शास्त्री यांनी कोहलीच्या विक्रमाबद्दल बोलताना गिलचे नाव घेतले.

शास्त्री म्हणाले की, त्याला सलामीवीर बनावे लागेल, कारण तेव्हाच त्याला धावा करण्याच्या अनेक संधी मिळतील. मला वाटतं शुभमन गिल हे करु शकतो, कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ते पुढे म्हणाले की, खेळपट्ट्या चांगल्या आहेत.

सलामीच्या फलंदाजांना अधिक संधी आहेत

शास्त्री म्हणाले की, 'विक्रम मोडणे खूप कठीण आहे, कारण 900 पेक्षा जास्त धावा ही मोठी धावसंख्या आहे, परंतु एक गोष्ट अशी आहे की, सलामीच्या फलंदाजांना दोन अतिरिक्त सामने आणि दोन अतिरिक्त डाव मिळतील, त्यामुळे ते हा विक्रम मोडू शकतात.'

तसेच, चालू मोसमात गिलने आतापर्यंत 3 सामन्यात 116 धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सध्या 11व्या क्रमांकावर आहे. शास्त्री यांचा अंदाज खरा ठरला तर युवा फलंदाजाला आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे.

गिलने रविवारी आयपीएलमध्ये (IPL) 2000 धावा पूर्ण केल्या. 77 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 126.24 च्या स्ट्राइक रेटने 32.52 च्या सरासरीने 2016 धावा नोंदवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT