Gujarat Titans Team  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 पूर्वी गुजरात टायटन्सची घोषणा, हार्दिक पांड्यानंतर 'हा' खेळाडू होणार कर्णधार!

IPL 2023: आयपीएल सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली आहे. यावर्षी पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी होणार आहे.

गुजरात टायटन्स संघाने गेल्या वर्षी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. हार्दिकने आतापर्यंत कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

अशा परिस्थितीत हार्दिक हा दीर्घकाळ गुजरातचा कर्णधार राहील. पण याच दरम्यान गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी असे विधान केले आहे, ज्यामुळे हार्दिकचा तणाव वाढू शकतो.

आगामी काळात हा खेळाडू होणार कर्णधार!

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) क्रिकेटची उत्तम जाण असून तो भविष्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास विक्रम सोलंकी यांनी व्यक्त केला आहे.

गिल गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतकासह यादरम्यान प्रभावी कामगिरी केली आहे.

गेल्या वर्षी गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सलग दुसऱ्या सत्रात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, परंतु संघ व्यवस्थापन गिलला भावी कर्णधार म्हणून पाहत आहे.

टीमचे डायरेक्टर काय म्हणले

गुरुवारी व्हर्च्युअल मीडिया सेशनमध्ये पत्रकारांशी बोलताना सोलंकी म्हणाले की, शुभमन चांगले नेतृत्व करु शकतो.

सोलंकी पुढे म्हणाले की, "मला वाटते की शुभमन भविष्यात कर्णधार म्हणून भूमिका बजावू शकतो, परंतु अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शुभमनमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचे गुण आहेत, तो प्रतिभावान आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

SCROLL FOR NEXT