Rajasthan Royals  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: राजस्थानचा गुवाहाटीत 'रॉयल' विजय! वॉर्नरची दिल्ली सलग तिसऱ्यांदा पराभूत

आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सने शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले आहे.

Pranali Kodre

Rajasthan Royals vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शनिवारी (8 एप्रिल) डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) होत आहे. या दिवसातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला.

या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा विजय आहे, तर दिल्लीला मात्र सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 200 धावांचे आव्हान विजयासाठी ठेवले होते. या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 9 बाद 142 धावाच करता आल्या.

दिल्लीकडून 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली नव्हती. पहिल्या षटकात ट्रेंट बोल्टने दिल्लीच्या पृथ्वी शॉ आणि मनिष पांडे या दोघांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर रिली रोसौने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तोही 14 धावा करून सहाव्या षटकात बाद झाला.

यानंतर मात्र वॉर्नरला ललित यादवने चांगली साथ दिली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण राजस्थानच्या गोलंदाजांना दिल्लीच्या धावगतीवर नियंत्रण ठेवले होते. दरम्यान, वॉर्नर आणि ललित यांची भागीदारी रंगत असतानाच 13 व्या षटकात ललितला बोल्टने त्रिफळाचीत केले. ललितने ३८ धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरबरोबर 64 धावांची भागीदारी केली.

यानंतर मात्र एका बाजूने वॉर्नर फलंदाजी करत असताना त्याला कोणाचीच साथ मिळाली नाही. वॉर्नरही 55 चेंडूत 7 चौकारांसह 65 धावा करून बाद झाला. अखेर दिल्लीला 57 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 2 विकेट्स घेतल्या, तर संदीप शर्माने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात जयस्वालने पाच चौकार ठोकत शानदार सुरुवात केली.

जयस्वाल एका बाजूने आक्रमक खेळत असताना दुसरी बाजूही बटलरने चांगली सांभाळली होती. जयस्वालने 25 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. पण अखेर त्यांची जोडी 9 व्या षटकात मुकेश कुमारने तोडली. त्याने जयस्वालला 60 धावांवर बाद केले. जयस्वालने ही खेळी 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 चेंडूत केली. जयस्वाल आणि बटलर यांच्यात सलामीला 98 धावांची भागीदारी झाली.

जयस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. पण नंतर शिमरॉन हेटमायरने बटलरला साथ दिली. बटलरनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला मुकेश कुमारनेच 19 व्या षटकात बाद केले. बटलरने 51 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह 79 धावा केल्या. अखेर हेटमायरने ध्रुव जुरेलच्या साथीने राजस्थानला 20 षटकात 4 बाद 199 धावांपर्यंत पोहोचवले.

दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या. तसेच रोवमन पॉवेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT