KL Rahul | Faf du Plessis Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: घरच्या मैदानात RCB समोर केएल राहुलच्या LSG चं आव्हान, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही...

आयपीएल 2023 स्पर्धेचा 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंटस् यांच्यामध्ये आज रंगणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंटस् यांच्यामध्ये सोमवारी आयपीएल 2023 मधील 15 वा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा विजयपथावर येण्यासाठी यजमान आरसीबी प्रयत्न करताना दिसेल, तर लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असतील.

आरसीबीला गोलंदाजीची चिंता

आरसीबीने सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला होता. पण त्यानंतर कोलकाताविरुद्ध 204 धावांचा पाठलाग करताना आरसीबी फलंदाजांची भंबेरी उडाली. सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती व सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजांसमोर त्यांची डाळ शिजली नाही.

आरसीबीला कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहली या दोनच फलंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही. वनिंदू हसरंगा आणि जोश हेझलवूड हे देखील या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळे गोलंदाजी विभागातही आरसीबीला अपयश येत आहे.

हसरंगा व हेझलवूड हे दोघेही या आठवड्यात संघाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र मोहम्मद सिराज हर्षल पटेल या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत अव्वल दर्जाची गोलंदाजी करणे आवश्यक आहे.

लखनऊचा विजयी लय राखण्याचा प्रयत्न

लखनऊ संघाने 7 एप्रिलला झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादला हरवले. या लढतीत मार्क वूड व आवेश खान ही जोडगोळी खेळली नाही. वूडला ताप आला होता, तर आवेशला दुखापत झाली होती. या लढतीत कृणाल पंड्या, रवी बिश्नोई व अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत लखनऊला विजय मिळवून दिला.

पण वूड व आवेश हे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. लखनऊला गरज असताना त्यांचा उपयोग होऊ शकतो. दरम्यान, कर्णधार राहुल, काईल मेयर्स व निकोलस पुरन यांच्याकडून समाधानकारक फलंदाजी झाली असून दीपक हुडा, मार्कस स्टॉयनीस यांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे. याशिवाय या सामन्यात अनुभवी क्विंटन डीकॉकला संधी मिळणार का हे देखील पाहावे लागणार आहे.

संभावित प्लेइंग इलेव्हन -

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डू प्लेसिस, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, मायरल ब्रेसवेल, डेव्हिड विली, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.

  • लखनई सुपर जायंट्स - केएल राहुल, काईल मेयर्स, दीपक हुडा, क्विंटन डीकॉक/मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, आवेश खान, मार्क वूड, रवी बिश्नोई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT