Vijaykumar Vyshak Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: तुफानी खेळणाऱ्या रॉयचा वैशाखच्या अप्रितिम यॉर्करने उडवला स्टंप, Video एकदा पाहाच

आरसीबीच्या विजयकुमार वैशाखने फिफ्टी ठोकलेल्या केकेआरच्या रॉयला ज्याप्रकारे त्रिफळाचीत केले, त्या चेंडूने सर्वांचेच लक्ष वेधले.

Pranali Kodre

Vijaykumar Vyshak's Yorker end Jason Roy's innings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉयच्या अर्धशतकाच्या जोरावर 200 धावांचा डोंगर उभा केला. पण या सामन्यात विजयकुमार वैशाखने रॉयला ज्याप्रकारे त्रिफळाचीत केले, त्या चेंडूने सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात बेंगलोरचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण कोलकाताकडून जेसन रॉय आणि एन जगदीशन यांनी चांगली सुरुवात दिली. त्यांनी सलामीला 83 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रॉयने अर्धशतकही पूर्ण केले.

पण, त्यांची भागीदारी धोकादायक ठरत असतानाच 10 व्या षटकात विजयकुमार वैशाखने दोघांनाही बाद केले. पण त्याने रॉयला बाद करताना टाकलेला चेंडूने सर्वांनाच प्रभावित केले. वैशाखने 10 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एन जगदीशनला 27 धावांवर बाद केले.

त्यानंतर वैशाखने या षटकातील अखेरचा चेंडू लेग स्टंपजवळ यॉर्कर लेंथला टाकला. तो चेंडू रॉयला खेळताच आला नाही आणि तो त्रिफळाचीत झाला. या विकेटसाठी वैशाखचे अनेकांनी कौतुक केले. रॉय 29 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 56 धावांची खेळी करून बाद झाला.

दरम्यान, सलामीवीर परत पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कोलकाताचा डाव कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी सांभाळला. या दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी 80 धावांची भागीदारी केली. पण ते दोघेही 18 व्या षटकात बाद झाले. दोघांनाही वनिंदू हसरंगाने बाद केले. राणाने 21 चेंडूत 48 धावांची खेळी केली, तसेच वेंकटेशने 26 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

अखेरीस डेव्हिड विसे आणि रिंकू सिंगने नाबाद राहात काही आक्रमक शॉट्स खेळल्याने कोलकाता 20 षटकात 5 बाद 200 धावांपर्यंत पोहचू शकले. विसे 12 आणि रिंकू 18 धावांवर नाबाद राहिले.

बेंगलोरकडून वैशाख आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तसेच मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

Priol: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

SCROLL FOR NEXT