Chennai Super Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: RR ला टक्कर देण्यासाठी धोनीच्या CSK ची खतरनाक रणनिती, प्लेइंग 11 मध्ये...

RR vs CSK Match: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या तीन सामन्यात सहज विजय मिळवला.

Manish Jadhav

IPL 2023, RR vs CSK: गेल्या दोन सामन्यांत पराभव पत्करलेली टीम राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पुनरागमन करण्याच्या आशेने आज मैदानात उतरेल, परंतु महेंद्रसिंग धोनीच्या संघावर मात करणे त्यांना सोपे जाणार नाही. सलग 3 विजयानंतर.

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या तीन सामन्यात सहज विजय मिळवला.

अशा स्थितीत या सामन्यात चेन्नईचे आघाडीचे फलंदाज आणि राजस्थानचे जागतिक दर्जाचे फिरकीपटू यांच्यात रोमांचक सामना रंगण्याची शक्यता आहे.

सीएसकेचे हे धाकड शानदार फॉर्ममध्ये

डेव्हन कॉनवेने या मोसमात सात सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करत 314 धावा केल्या आहेत, तर अजिंक्य रहाणे शानदार फॉर्ममध्ये आहे.

रहाणेने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) केवळ 29 चेंडूत नाबाद 71 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. रहाणेने आतापर्यंत पाच सामन्यांत 209 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 199.04 आहे.

प्लेइंग 11 मध्ये हे मोठे बदल होतील

या मोसमात चेन्नईविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला होता, ही रॉयल्ससाठी दिलासादायक बाब आहे. त्या सामन्यातही धोनीने चेन्नईला विजयाच्या जवळ नेले होते, परंतु अखेरीस त्याच्या संघाला घरच्या मैदानावर तीन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

पण त्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. चेन्नईने पाच विजयांसह 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

सवाई मानसिंग स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास त्याच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता बळकट होईल. यासाठी राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.

खेळपट्टी स्पिनर्संना मदत करेल अशी अपेक्षा

सलग दोन सामन्यांतील पराभवामुळे, राजस्थान आपल्या संघाची मोहीम पुन्हा रुळावर आणण्यासाठी आतुर असेल.

चेन्नई सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी रॉयल्स मैदानात उतरेल.

राजस्थानला चेन्नईचा पराभव करायचा असेल, तर त्याचे आघाडीचे फलंदाज जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांना चांगली कामगिरी करावी लागेल. खेळपट्टीमुळे फिरकीपटूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), तुषार देशपांडे, महेश तिक्षना, मथिश पाथीराना, आकाश सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

SCROLL FOR NEXT