Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: CSK विरुद्ध रजवाडेच ठरले किंग! RR चा चेन्नईवर 32 धावांनी शानदार विजय

आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 32 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 32 धावांनी पराभव केला.

चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. यापूर्वी चेन्नईचा तीन धावांनी पराभव झाला होता.

पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 170 धावा करु शकला.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या.

राजस्थानकडून यशस्वीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 43 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले.

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली.

जोस बटलर 21 चेंडूत 27 धावा करुन बाद झाला. कर्णधार संजू सॅमसन 17 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल 43 चेंडूत 77 धावा करुन बाद झाला.

शिमरॉन हेटमायर 10 चेंडूत आठ धावा करुन बाद झाला. यानंतर, ध्रुव जुरेल आणि देवदत्त यांनी दमदार फलंदाजी करत संघाला 200 च्या पुढे नेले.

जुरेल 15 चेंडूत 34 धावा करुन बाद झाला. देवदत्त पडिक्कलने 13 चेंडूत 23 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

CSK ची सुरुवात खराब झाली

राजस्थानच्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना CSK ची सुरुवात खराब झाली. स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अवघ्या 8 धावा करुन बाद झाला.

त्याचवेळी, गेल्या अनेक डावांमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेलाही केवळ 15 धावा करता आल्या.

;तर, ऋतुराज गायकवाडने 42 धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय, शिवम दुबेने शानदार अर्धशतक झळकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT