MI vs GT Dainik Gomantak
क्रीडा

चेन्नईविरुद्ध कोण खेळणार IPL Final? आज होणार निर्णय...! पाहा मुंबई - गुजरातची संभावीत Playing XI

आयपीएल 2023 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.

Pranali Kodre

IPL 2023 Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स आणि पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्स आमने-सामने येणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर यापूर्वी आयपीएल 2023 स्पर्धेत झालेल्या सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा सामनाही मोठ्या धावसंख्येचा होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी गुजरातचा संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करू शकतात. ते दर्शन नळकांडे ऐवजी पुन्हा यश दयालला संधी देऊ शकतात. याशिवाय मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा सलामीला फलंदाजी करू शकतात, तर मधली हार्जिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर सांभाळू शकतात.

तसेच साई सुदर्शनला इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून वापरता येऊ शकते. त्याचबरोबर खालची फळी अष्टपैलू दसून शनका आणि राहुल तेवतिया सांभाळू शकतात. त्याचबरोबर राशिद खाननेही त्याच्यातील फलंदाजी कौशल्य दाखवले आहे.

राशिद संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणूनही भूमिका निभावेल, तसेच गोलंदाजी फळीत यश दयालसह नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा यांचीही साथ मिळेल.

मुंबई प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला फलंदाजी करू शकतात. मधली फळी सांभळण्यासाठी ख्रिस ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड यांना संधी मिळू शकते. ग्रीन अष्टपैलू खेळाडू असल्याने तो गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

तसेच ख्रिस जॉर्डनही वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळण्याबरोबरच खालच्या फळीत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. तसेच गोलंदाजी फळीत पीयुष चावला, आकाश मधवास, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकिन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ यांनाही संधी मिळू शकते. नेहल वढेरा इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून खेळू शकतो.

आमने-सामने

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायट्स तीन वेळा आमने सामने आले आहेत. यातील एक वेळा गुजरातने विजय मिळवला आहे, तर दोनवेळा मुंबई इंडियन्सने विजय मिळवलेला आहे.

फायनलचं तिकीट मिळवणार कोण?

या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना करणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने पहिला क्वालिफायर सामना जिंकत थेट अंतिम सामन्याची पात्रता मिळवली आहे. अंतिम सामना रविवारी 28 मे रोजी रंगणार आहे.

संभावित प्लेइंग इलेव्हन -

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, दसून शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, यश दयाल, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा (इम्पॅक्ट सब्स्टिट्युट - साई सुदर्शन)

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, ईशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, आकाश मधवाल, हृतिक शोकिन, कुमार कार्तिकेय, जेसन बेऱ्हेंडॉर्फ (इम्पॅक्ट सब्स्टिट्युट - नेहल वढेरा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT