GT vs CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Playoff: क्वालिफायर मॅचसाठी चेन्नई - गुजरात करणार टीममध्ये बदल? अशी असू शकते Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची संभावित टीम कशी असेल जाणून घ्या

Pranali Kodre

IPL 2023, Qualifier 1, Gujarat Titans vs Chennai Super Kings: मंगळवारी (23 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत प्लेऑफच्या फेरीला सुरुवात होत असून पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम सामना खेळण्यास उत्सुक असतील. जर हा सामना चेन्नईने जिंकला, तर चन्नई तब्बल 10 व्यांदा अंतिम सामन्यात खेळेल, तसेच जर गुजरातने हा सामना जिंकला, तर गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळेतील.

खेळपट्टी

त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे संयोजनही महत्त्वाचे ठरणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभांगाना पोषक राहिली आहे.

त्यातही या खेळपट्टीवर बऱ्याचदा फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येते. मात्र, या स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यावेळी दवाचे प्रमाण दिसून आले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदाही मिळू शकतो.

आमने - सामने कामिगिरी

चेन्नई आणि गुजरात आयपीएलमध्ये आत्तापर्यंत तीनवेळा आमने - सामने आले आहेत. या तिन्ही वेळी गुजरातने वर्चस्व राखले असून विजय मिळवला आहे. त्यामुळे गुजरात त्यांचे हे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर चेन्नई गुजरातविरुद्ध पहिला विजय मिळवण्यास उत्सुक असेल.

संभावित प्लेइंग इलेव्हन

या सामन्यासाठी चेन्नई त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. चेन्नई संघात फारसे बदल करण्यासाठी ओळखली जात नाही. त्यामुळे या सामन्यातही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

त्याचमुळे डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड सलामीला उतरतील. तर मधल्या फळीत अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू आणि एमएस धोनी हे फलंदाज असू शकतात. याशिवाय अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि मोईन अली हे दोघे संघात खेळू शकतात. हे दोघे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतानाही दिसतील.

त्याचबरोबर गोलंदाजी फळीत महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, दीपक चाहर हे खेळाडू दिसू शकतात. पाथिराना इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टिट्यूट असू शकतो.

गुजरातचा संघ देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता कमी आहे. फक्त एक बदल होण्याची शक्यता आहे. दसून शनका किंवा जोशुआ लिटिल इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसू शकतात. तसेच विजय शंकर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकेल.

गुजरातकडून सलामीला वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल उतरू शकतात. तसेच मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया सांभाळू शकतात. हार्दिक आणि तेवतिया गोलंदाजीतही योगदान देऊ शकतात.

त्याचबरोबर गोलंदाजी फळीत राशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा खेळू शकतात. दरम्यान राशीद खालच्या फळीत फलंदाजीही करू शकतो.

दोन्ही संघांचे संभावित प्लेइंग इलेव्हन

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधा/यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा (इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट - मथिशा पाथिराना).

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुदर्शन/विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, यश दयाल (इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट: जोशुआ लिटल/दसून शनाका).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT