Mohammed Shami Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Purple Cap: 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपचा बादशहा कोण? टॉप 5 मध्ये केवळ 1 विदेशी गोलंदाज

IPL 2023: गुजरातचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. त्याने 13 सामन्यात एकूण 23 विकेट घेतल्या आहेत.

Manish Jadhav

IPL 2023 Purple Cap: आयपीएल 2023 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 15 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्याचा पर्पल कॅपच्या शर्यतीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

गुजरात संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. त्याने 13 सामन्यात एकूण 23 विकेट घेतल्या आहेत.

वास्तविक, आयपीएल (IPL) 2023 मध्ये 64 सामने झाले आहेत. या लीगमध्ये आतापर्यंत भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 पैकी 4 भारतीय गोलंदाज आहेत.

गुजरात संघाचा स्टार फिरकीपटू रशीद खान 23 विकेट्ससह दुसऱ्या तर राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल 21 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर मुंबईचा फिरकीपटू पियुष चावला आहे, ज्याने 13 सामन्यांत 20 बळी घेतले आहेत.

या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज

23- मोहम्मद शमी (Mohammed Shami) (GT) सामना 13

23- राशिद खान (GT), सामना 13

21- यजुवेंद्र चहल (आरआर), सामना 13

20- पियुष चावला (MI) सामना 13

19- वरुण चक्रवर्ती (केकेआर) सामना 13

पर्पल कॅप देण्यामागे उद्देश काय, कोणाला दिली जाते?

पर्पल कॅप हा आयपीएलमध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला ही कॅप दिली जाते. ही ऑरेंज कॅपसारखेची आहे, जी एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते.

मागच्या वेळी पर्पल कॅप कोणाला दिली होती?

आयपीएल 2022 मध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने पर्पल कॅप मिळवली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 27 बळी घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT