Mohammed Siraj Dainik Gomantak
क्रीडा

Video: गोलंदाजीच नाही, तर फिल्डिंगमध्येही चमकला सिराज, डायरेक्ट थ्रोने फलंदाजाला धाडलं माघारी

PBKS vs RCB: पंजाब किंग्सविरुद्ध रॉयल्स चॅलेजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवली.

Pranali Kodre

Mohammed Siraj Direct Hit: गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 27 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने 24 धावांनी विजय मिळवला. बेंगलोरच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्ससमोर 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग पंजाब संघ करत असताना त्यांना सिराजने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. त्याने सलामीवीर अथर्व तायडेला पहिल्याच षटकात 4 धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर त्याने चौथ्या षटकात धोकादायक लियाम लिव्हिंगस्टोनला 2 धावांवर पायचीत केले.

इतकेच नाही तर त्याने सहाव्या षटकात एक सुरेख धावबादही केले. झाले असे की पंजाब संघाने आधीच 27 धावांत 3 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर हरप्रित सिंग भाटिया आणि प्रभसिमरन सिंग डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र विजयकुमार वैशाख गोलंदाजी करत असलेल्या सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर प्रभसिमरनने मिड-ऑफच्या दिशेने फटका मारला. त्यानंतर त्याने हरप्रितसह धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याने सिराजने चेंडू पकडल्याचे पाहिले आणि धावेसाठी नकार दिला. पण तोपर्यंत हरप्रित पुढे आला होता आणि तो माघारी जाईपर्यंत सिराजने चेंडू थेट स्टंपवर मारला. त्यामुळे हरप्रितला 13 धावांवर माघारी जावे लागले. हरप्रितला धावबाद केल्यानंतर सिराजने रोनाल्डोसारखे 'स्यु' सेलिब्रेशनही केले.

महत्त्वाचे म्हणजे सिराजने यानंतरही चांगली गोलंदाजी करताना हरप्रीत ब्रार आणि नॅथन एलिस यांना 18 व्या षटकात त्रिफळाचीत केले आणि सामन्यात बेंगलोरचे वर्चस्व निर्माण केले. या सामन्यात सिराजची कामगिरी चांगली राहिली. त्याने 4 षटकात गोलंदाजी करताना 21 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. तसेच एक धावबाद केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

विराट-फाफची शतकी भागिदारी

या सामन्यात पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने 46 धावांची आणि जितेश शर्माने 27 चेंडूत 41 धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोघांनाही दुसऱ्या बाजूने अन्य खेळाडूंकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे पंजाबचा डाव 18.2 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला. बेंगलोरकडून सिराज व्यतिरिक्त वनिंदू हसरंगाने 2 विकेट्स घेतल्या, तसेच वेन पार्नेल आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस आणि प्रभारी कर्णधार विराट कोहलीने दमदार सुरुवात देताना सलामीला 137 धावांची भागीदारी केली. तसेच या दोघांनीही अर्धशतकी खेळीही केली.

फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली, तर विराटने 59 धावांची खेळी केली. त्यामुळे बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 174 धावा केल्या होत्या. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT