Sam Curran and Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: विराट पुन्हा RCB चा कर्णधार, 'या' कारणामुळे घेण्यात आला मोठा निर्णय

आयपीएल 2023 स्पर्धेत आज पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होत असून विराट कोहली नेतृत्व करताना दिसणार आहे, तर लिव्हिंगस्टोनही पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

Punjab Kings vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी डबल हेडर खेळवण्यात येणार असून पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होत आहे. हा हंगामातील 27 वा सामना असून पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या सामन्यात बेंगलोर संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिस ऐवजी विराट कोहली करणार आहे. त्यामुळे सॅम करनसह नाणेफेकीवेळी विराटच उभा होता. विराटने यामागील कारण नाणेफेकीवेळी स्पष्ट केले आहे.

विराटने सांगितले की 'फाफ आज त्याच्या क्षमतेनुसार क्षेत्ररक्षण करू शकणार नाही. त्यामुळे तो या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल, त्याच्याजागेवर नंतर विजयकुमार वैशाख येईल.'

'आम्हाला जे करायचे होते, ते करायला मिळणार आहे, कारण आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. कारण खेळपट्टी कदाचीत धीमी होऊ शकते आणि काही खेळपट्टीवरील खरबरीत जागा गोलंदाजांना मदत करू शकतात. सध्या आम्ही एकाएका सामन्याचा विचार करत आहोत. आम्ही या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.'

फाफला झालेली दुखापत

17 एप्रिल रोजी आरसीबीचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या पोटाजवळ जखम झाली होती.

त्याच जखमेवर त्याने फलंदाजीदरम्यान मलमपट्ट्याही बांधलेल्या दिसल्या होत्या. याच कारणामुळे तो आज पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करणार नसल्याचे अंदाज सध्या व्यक्त होत आहे.

पंजाबचा कर्णधारही दुखापतग्रस्त

दरम्यान, पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याने 15 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सामना खेळला नव्हता. तसेच आता तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे. त्याचमुळे पंजाबचे नेतृत्व सॅम करन करत आहे.

दरम्यान, पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे यंदा तो पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. तसेन नॅथन एलिसला कागिसो रबाडा ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज

  • पंजाब किंग्ज: अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षण), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT