Mahendra Singh Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: धोनीच्या 'या' व्हिडिओचा सोशल मीडियावर धूमाकूळ, दीपक चहरशी...; पाहा Video

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनी मैदानावर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो.

Manish Jadhav

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनी मैदानावर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. कधी-कधी 'कॅप्टन कूल' सामना सोडून इतर सहकारी खेळाडूंसोबत विनोद करतानाही दिसतो.

धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दीपक चहरसोबत वेगळ्या पद्धतीने विनोद करत आहे.

वास्तविक, दीपक सीएसकेचा बॉलिंग कोच ड्वेन ब्राव्होशी काहीतरी बोलत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यातच धोनी त्याच्या जवळून जातो, मात्र तो त्याच्याकडे लक्ष देऊ शकला नाही.

अचानक धोनीला काय वाटलं की, त्याने दीपकची चेष्टा करण्यासाठी हात वर केला. धोनीने अचानक हात वर करताच चहर पहिल्यांदा घाबरला आणि नंतर हसायला लागला.

दरम्यान, एमएस धोनी 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने शेवटच्या 2 षटकांमध्ये शानदार फटकेबाजी करत संघाला 167 धावांपर्यंत नेले. चेन्नई हा सामना त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळत आहे, तो पाहण्यासाठी कॅप्टन कूलचे कुटुंबीयही उपस्थित आहे.

धोनीने 20 धावा केल्या

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 8 गडी गमावून 167 धावा केल्या. तरीही एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही.

धोनीने 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 20 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 24, डेव्हॉन कॉनवेने 10, अजिंक्य रहाणेने 21, शिवम दुबेने 25 आणि अंबाती रायडूने 23 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 21 धावांचे योगदान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT