IPL 2023: वढेराने मारला असा सिक्स की आता टाटांना करावे लागणार 5 लाख दान

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 9 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 6 विकेट्सने पराभूत केले.

MI vs CSK | Dainik Gomantak

याच सामन्यादरम्यान मुंबईचा डाव सुरू असताना 11 व्या षटकात नेहल वढेराने वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर असा काही शॉट मारला की चेंडू मैदानाबाहेर उभ्या असलेल्या टाटा टियागो इव्ही कारला लागला.

Nehal Wadhera | Dainik Gomantak

त्याने शॉट इतका जोरदार मारला होता की त्यामुळे कारवर छोटा डेन्टही आला.

Nehal Wadhera | Dainik Gomantak

विशेष गोष्ट अशी की मैदानाबाहेर ठेवलेल्या या कारला चेंडू लागल्यानंतर आयपीएलचे प्रायोजक असलेल्या टाटा समुहाकडून प्रत्येकवेळी कर्नाटकमधील कॉफीच्या बागांच्या लागवड वाढीसाठी पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

Car dent | Dainik Gomantak

याआधी याच हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्याही एका शॉटवर या कारला यापूर्वी चेंडू लागला होता.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

दरम्यान, आयपीएल 2023 च्या अखेरीस सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूला ही कार बक्षीस म्हणून मिळणार आहे.

Nehal Wadhera | Dainik Gomantak

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास वढेराने 34 चेंडूत 52 धावा ठोकल्या. तसेच त्याने 35 चेंडूत 83 धावांची खेळी करणाऱ्या सूर्यकुमारबरोबर 140 धावांची भागीदारीही केली.

Suryakumar Yadav - Nehal Wadhera | Dainik Gomantak
Ruturaj Gaikwad | Suryakumar Yadav | Dainik Gomantak