Arshdeep Singh Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: नो-बॉलवर कंट्रोल करण्यासाठी वापरली 'ही' रणनीती, अर्शदीपचा खुलासा

अर्शदीप सिंगने त्याच्या नो-बॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय बदल केला, याबद्दल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Arshdeep Singh revealed how he overcome his problem of delivering no balls: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत शनिवारी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर १३ धावांनी पराभवाचा धक्का दिला. पंजाबच्या या विजयात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे योगदान महत्त्वाचे राहिले.

अर्शदीपने या सामन्यात ४ षटकात २९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे पंजाबने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना मुंबईला अखेरच्या षटकात १६ धावांचीच गरज होती. अशा दबावाच्या परिस्थितीतही अर्शदीपने शानदार गोलंदाजी करताना केवळ २ धावा दिल्या आणि सलग दोन चेंडूत तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांना त्रिफळाचीतही केले. त्यामुळे पंजाबने या सामन्यात सहज विजय मिळवला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अर्शदीपला एकाच सामन्यात अनेक नो-बॉल टाकल्याने टीकेला सामोरे जावे लागले होते. पण असे असतानाही त्याने त्याच्यात सुधारणा घडवली. याबद्दल त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर खुलासा केला आहे.

अर्शदीपने त्याच्या यशाचे श्रेय दबावाच्या क्षणी शांत रहाण्याला आणि त्याच्या रनअपमध्ये बदल करण्याला दिले आहे. अर्शदीप म्हणाला, 'जेव्हाही विकेट्स घेतो तेव्हा छान वाटते. जिंकल्यानंतरही चांगले वाटत आहे. आयपीएलच्या आधी मी माझा रनअप छोटा केला आहे, ज्यामुळे नो-बॉलवर नियंत्रण राहिल. माझी लय सध्या चांगली आहे आणि खेळायला मजा येत आहे. माझ्या हृदयाची धडधड आता १२० च्या वर जात नाही.'

दरम्यान, अर्शदीपचे पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनीही देखील कौतुक केले आहे.

सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेत ३१ सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सध्या पर्पल कॅपचा मान त्याच्याकडे आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास पंजाबने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 6 बाद 201 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा हा या हंगामातील 6 सामन्यांमधील तिसरा पराभव आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईने सलग तीन सामने जिंकल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पंजाबचा हा 7 सामन्यांमधील चौथा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT