Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: रोहित शर्मा 'या' कारणामुळे कोलकाताविरुद्ध खेळणार नाही! सूर्यकुमार मुंबईचा नवा कर्णधार

MI vs KKR: आज होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा ऐवजी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. तसेच अर्जुन तेंडुलकरचेही पदार्पण झाले आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार मुंबईचा आठवा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, शॉन पोलॉक, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, ड्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्ड यांनी मुंबईचे नेतृत्व केले आहे.

...म्हणून रोहित खेळणार नाही

नाणेफेकीवेळी सूर्यकुमार मुंबईचा कर्णधार म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले की 'रोहित बाहेर झाला आहे, त्याला पोटदुखीचा त्रास होत आहे.' त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीनुसार रोहित या सामन्यात आजारी असल्याने खेळताना दिसणार नाही.

मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरला संधी

मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्जुन तेंडुलकरचाही समावेश केला आहे. तसेच युवा ड्युआन यान्सिनला देखील संधी दिली आहे. त्यामुळे हे दोघेही या सामन्यातून आयपीएल पदार्पण करणार आहेत.

दरम्यान, या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, रमनदीप सिंग, अर्शद खान, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय यांची निवड केलेली आहे.

आंद्रे रसेल खेळणार

या सामन्यात कोलकाताच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आंद्रे रसेल खेळताना दिसणार आहे. त्याला मागच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, आजच्या सामन्यासाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. त्यामुळे तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोलकाताने इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये सुयश शर्मा, डेव्हिड विजे, अनुकूल रॉय, मनदीप सिंग आणि वैभव अरोरा यांची निवड केली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • कोलकाता नाईट रायडर्स - रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

  • मुंबई इंडियन्स - इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, ड्युआन यान्सिन, रिले मेरेडिथ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

Two US Navy Aircraft Crash: 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

Prithvi Shaw Double Century: 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

SCROLL FOR NEXT