Ajinkya Rahane - Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: धोनीच्या CSK ने मारलं वानखेडेचं मैदान! रोहितच्या MI वर 'मुंबईकर' रहाणे पडला भारी

आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी १२ वा खेळाडू मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. मुंबईच्या घरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेने 7 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात मुंबईने सीएसकेसमोर विजयासाठी 158 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेने 18.1 षटकात 3 विकेट्स गमावत 159 धावा करत सामना जिंकला.

दरम्यान, सीएसकेचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर मुंबईने या हंगामातील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. सध्या आयपीएलमधील 12 सामन्यांनंतर सीएसके 4 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आले आहेत, तर मुंबईचे अद्याप गुणांचे खाते उघडलेले नाही, पण मुंबई आठव्या क्रमांकावर आहेत.

या सामन्यात मुंबईने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेने पहिली विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे शुन्यावरच पहिल्या षटकात जेसन बेऱ्हेनडॉर्फच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आणि सीएसकेकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने तुफानी खेळी केली.

एका बाजूने त्याने आक्रमण केले असताना दुसरी बाजू ऋतुराज गायकवाडने सांभाळली. रहाणेने चौथ्या षटकात अर्शद खान विरुद्ध एक षटकार आणि चार सलग चौकार ठोकत एकूण 23 धावा काढल्या. त्याने 19 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. अखेर त्याच्या खेळीला पीयुष चावलाने आठव्या षटकात लगाम लावला. रहाणे 27 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावा करून बाद झाला.

त्याच्यानंतर ऋतुराज आणि शिवम दुबेनेही चांगली भागीदारी केली. दुबेने काही चांगले फटकेही खेळले. पण त्याला कुमार कार्तिकेयने 15 व्या षटकात बाद केले. दुबेने 26 चेंडूत 28 धावा केल्या. दुबे बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अंबाती रायुडू फलंदाजीला उतरला. त्याने ऋतुराजच्या साथीत सीएसकेला विजयापर्यंत पोहोचवले. ऋतुराज 36 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला, तर अंबाती रायुडू 16 चेंडूत 20 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, सीएसकेने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनने चांगली सुरुवात केली होती. पण रोहितला चौथ्या षटकात 21 धावांवर तुषार देशपांडेने त्रिफळाचीत केले. तरी मुंबईने पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकात 61 धावा धावफलकावर लावल्या होत्या.

मात्र त्यानंतर सीएसकेच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. सातव्या षटकात ईशान किशनला रविंद्र जडेजाने 32 धावांवर माघारी धाडले, तर पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादव धोनीने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे 1 धावेवर माघारी परतला. मिचेल सँटेनरने टाकलेला चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला घासून धोनीकडे झेल गेला होता. पण पंचांनी नाबाद घोषीत केल्यानंतर धोनीने रिव्ह्यूची मागणी केली, ज्यात सूर्यकुमार बाद असल्याचे स्पष्ट दिसले.

यानंतर कॅमेरॉन ग्रीनेही 12 धावांवर आणि अर्शद खान 2 धावांवर माघारी परतले. पण तिलक वर्माने टीम डेव्हिडबरोबर भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. त्यांची भागीदारी रंगतही होती. तिलकचा अडथळा जडेजानेच दूर केला. तिलक 22 धावांवर बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सही (५) फार काही करू शकला नाही.

टीम डेव्हिडने काही चांगले शॉट मारले पण त्यालाही 22 चेंडूत 31 धावा केलेल्या असताना तुषार देशपांडेने बाद केले. अखेर हृतीक शोकिन आणि पीयुष चावलाने नंतर विकेट्स न गमावता मुंबईला 20 षटकात 8 बाद 157 धावांपर्यंच पोहोचवले.

गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने सीएसकेकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल सँटेनर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर सिसांडा मगलाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT