LSG vs MI Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Eliminator: 'करो वा मरो' सामन्यात रोहितने जिंकला टॉस! मुंबई - लखनऊची अशी आहे Playing XI

IPL 2023 स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात एलिमिनेटर सामना होत असून या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होणार आहे.

Pranali Kodre

IPL 2023 Lucknow Super Giants vs Mumbai Indians, Eliminator: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात एलिमिनेटर सामना होत आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने कुमार कार्तिकेय ऐवजी हृतिक शोकिनला संधी दिली आहे. तसेच लखनऊ संघात दीपक हुडाचे पुनरागमन झाले आहे. तसेच क्विंटन डी कॉक मात्र या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून काईल मेयर्स दिसण्याची शक्यता आहे.

या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ या परदेशी खेळाडूंना खेळवले आहे. तसेच लखनऊने प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक या परदेशी खेळाडूंना खेळवले आहे.

त्यामुळे मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूला खेळवता येणार आहे. तसेच लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र तीनच परदेशी खेळाडू असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय किंवा परदेशी खेळाडूला वापरू शकतात.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये लखनऊने काईल मेयर्स, डॅनिएल सॅम्स, युधवीर सिंग, स्वप्नील सिंग आणि अमित मिश्रा यांना संधी दिली आहे. तसेच मुंबईने राखीव खेळाडूंमध्ये रमनदीप सिंग, कुमार कार्तिकेय, विष्णू विनोद, नेहल वढेरा आणि संदीप वॉरियर यांना संधी दिली आहे.

दरम्यान, या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. तसेच विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी २६ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • लखनऊ सुपर जायंट्स - आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसीन खान

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, आकाश मधवाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT