IPL 2023 Dot Ball: डॉट बॉलऐवजी झाडाचं चित्र दिसतंय तरी का? वाचा नक्की कारण काय

आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत असलेल्या सामन्यादरम्यान डॉट बॉलच्या जागेवर झाडाचं चित्र का दाखवलं जात आहे, जाणून घ्या.
IPL 2023 Playoff
IPL 2023 PlayoffDainik Gomantak
Published on
Updated on

Plant 500 trees for every dot ball in the IPL 2023 playoffs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत प्लेऑफला मंगळवारपासून (23 मे) सुरुवात झाली आहे. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जात आहे.

दरम्यान, टीव्हीवर आणि ऑनलाईन हा सामना पाहाताना अनेक चाहत्यांना निर्धाव चेंडूच्या (डॉट बॉल) जागेवर झाडाचं चित्र दिसलं असेल. त्यामुळे अनेक चाहते असं झाड का दाखवलं जात आहे, असा प्रश्नही विचारत आहेत.

IPL 2023 Playoff
IPL 2023: शुभमन गिलचं शतक अन् RCB चा स्वप्नभंग! गुजरातच्या विजयानं मुंबई Playoff मध्ये

पण यामागे एक कौतुकास्पद कारण म्हणजे टाटा समुह आणि बीसीसीआयचा पर्यावरणाच्या दृष्टीने सुरु केलेला हा एक उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आयपीएलमधील प्लेऑफच्या सामन्यांमध्ये प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रोपांचे रोपण केले जाणार आहे.

याच उपक्रमामुळे सामन्यादरम्यान निर्धाव चेंडू दर्शवताना झाडाचे चित्र चाहत्यांना दिसत आहे.

टॉप चार संघ

आयपीएल 2023 मधील अंतिम 4 संघ निश्चित झाले आहेत. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी अनुक्रमे गुणतालिकेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक पटकात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

IPL 2023 Playoff
IPL 2023 Playoff: प्लेऑफमधून कसे मिळणार दोन फायनालिस्ट? जाणून घ्या संपूर्ण फॉरमॅट

पहिला क्वालिफायर

दरम्यान, आयपीएल 2023 मधील क्वालिफायरचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

    राखीव खेळाडू - मथिशा पाथिराना, मिचेल सँटेनर, सुभ्रांशू सेनापती, शेख राशिद आणि आकाश सिंग 

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या(कर्णधार), दसुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

    राखीव खेळाडू - विजय शंकर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, जयंत यादव आणि शिवम मावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com