CSK Video: सेलिब्रेशन तर होणारच! दहाव्यांदा IPL Final गाठल्यानंतर चेन्नईच्या टीमचा जोरदार जल्लोष

Video: चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर जोरदार जल्लोष केला.
Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak
Published on
Updated on

Chennai Super Kings celebrate win against Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी (23 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 15 धावांनी विजय मिळवत थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला.

एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही दहावी वेळ ठरली आहे. दरम्यान, चेन्नईने मंगळवारी गुजरातविरुद्ध विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर जोरदार जल्लोष केला.

Chennai Super Kings
IPL 2023: धोनीची CSK तब्बल 10व्यांदा फायनलमध्ये! क्वालिफायरमध्ये गुजरात पराभूत

चेन्नईने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 20 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर 157 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर चेन्नईच्या गोटात उत्साह पाहायला मिळाला.

चेन्नईने सामना जिंकताच डगआऊटमध्ये असलेल्या सपोर्ट स्टाफ सदस्यांनी आणि अन्य खेळाडूंची जल्लोष केला. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्रावो, फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी, मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग हे देखील दिसले. तसेच मैदानावरही खेळाडूंनी आनंद साजरा केला.

सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांशी आणि आपल्या संघातील खेळाडूंशी हात मिळवतानाही चेन्नईच्या खेळाडूंचा आनंद ओसंडून वाहत होता. या क्षणांचे व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.

चेन्नईने जिंकला सामना

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली. त्याचबरोबर अखेरीस रविंद्र जडेजानेही 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.

गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.

Chennai Super Kings
IPL 2023 Playoff: प्लेऑफमधून कसे मिळणार दोन फायनालिस्ट? जाणून घ्या संपूर्ण फॉरमॅट

त्यानंतर गुजरातकडून शुभमन गिलने 42 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त केवळ राशिद खानने 20 धावांचा टप्पा ओलांडला. राशिदने 30 धावांची खेळी केली. पण अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे गुजरातचा संघ सर्वबाद झाला.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.

चेन्नई दहाव्यांदा अंतिम सामन्यात

मंगळवारी चेन्नईने गुजरातला हरवल्याने दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने यापूर्वी 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019 आणि 2021 या वर्षीही आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 2010, 2011, 2018 आणि 2021 यावर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com