Nitish Rana Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबविरुद्ध विजय मिळवूनही KKR कर्णधाराला भोवली 'ही' चूक! भरावा लागणार मोठा दंड

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला.

Pranali Kodre

KKR Captain Nitish Rana fined: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्सं संघात सामना पार पडला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने अखेरच्या चेंडूवर 5 विकेट्सने विजय मिळवला. पण या सामन्यात कोलकाता संघाकडून झालेल्या एका चूकीमुळे कर्णधार नितीश राणाला मोठा दंड भरावा लागणार आहे.

कोलकाताकडून या सामन्यात निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण न झाल्याने नितीश राणाला दंड भरावा लागणार आहे. राणावर करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धपत्रकात दिलेल्या माहितीनुसार कोलकाता संघाने पंजाब किंग्सविरुद्ध षटकांची गती कमी राखली होती. आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गती कमी राखण्याबाबतची ही संघाची या हंगामातील पहिली चूक होती. त्यामुळे कर्णधार नितीश राणावर 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

दरम्यान, षटकांची गती कमी राखली म्हणून लाखोंचा दंड होणारा राणा पहिला कर्णधार नाही. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल यांना देखील आयपीएल 2023 हंगामात षटकांची गती कमी राखल्यामुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून दुसऱ्यांदा षटकांची गती कमी राखली गेल्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर प्रभारी कर्णधार विराट कोहलीवर 24 लाखांचा दंड आणि संघावरही दंडाची कारवाई करण्यात आली होती.

कोलकाताचा विजय

सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनने केलेल्या 57 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 7 बाद 179 धावा केल्या होत्या आणि कोलकातासमोर 180 धावांचे आव्हान ठेवले होते. कोलकाताकडून  वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर या सामन्यात अखेरच्या दोन षटकात कोलकाताला 26 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या षटकात आंद्र रसेलने सॅम करनच्या गोलंदाजीवर आक्रमण करत 3 षटकारांसह 19 धावा चोपल्या. या षटकात रिंकू सिंगने 1 धाव काढली.

अखेरच्या षटकात कोलकाताला केवळ 6 धावांची गरज होती. पण या षटकात अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती. तसेच रसेल 42 धावा करून धावबादही झाल्याने मोठा अडथळा दूर झालेला. त्यामुळे अखेरच्या चेंडूत कोलकातासमोर 2 धावा करण्याचे आव्हान होते.

यावेळी रिंकूने चौकार ठोकला आणि कोलकाताचा विजय निश्चित केला. रिंकू  21 धावा करून नाबाद राहिला. तसेच त्याआधी कर्णधार नितीश राणाने 38 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावांची खेळी केली होती. पंजाबकडून राहुल चाहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

SCROLL FOR NEXT