Andre Russell Rinku Singh Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबवर घोंगावलं रसेलचं वादळ! रिंकूचा शेवटच्या बॉलवर चौकार अन् कोलाकाताचा विजयावर शिक्कामोर्तब

आयपीएलमध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या चेंडूवर पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवला.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 5 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात अखेरच्या दोन षटकात कोलकाताला 26 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या षटकात आंद्र रसेलने सॅम करनच्या गोलंदाजीवर आक्रमण करत 3 षटकारांसह 19 धावा चोपल्या. या षटकात रिंकू सिंगने 1 धाव काढली.

अखेरच्या षटकात कोलकाताला केवळ 6 धावांची गरज होती. पण या षटकात अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती. तसेच रसेल धावबादही झाल्याने मोठा अडथळा दूर झालेला. त्यामुळे अखेरच्या चेंडूत कोलकातासमोर 2 धावा करण्याचे आव्हान होते. यावेळी रिंकूने चौकार ठोकला आणि कोलकाताचा विजय निश्चित केला.

या सामन्यात पंजाबने कोलकातासमोर 180 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान कोलकाताने 5 विकेट्स गमावत 20 षटकात 182 धावा करत पूर्ण केले.

या सामन्यात कोलकाताकडून जेसन रॉय आणि रेहमनुल्लाह गुरबाज यांनी डावाची सुरुवात केली होती. त्यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण गुरबाज 15 धावांवर नॅथन एलिसच्या चेंडूवर पायचीत झाला. नंतर रॉय आणि कर्णधार नितीश राणाने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण चांगली सुरुवात मिळालेली रॉय 24 चेंडूत 38 धावा करून बाद झाला.

पण त्यानंतर राणाला वेंकटेश अय्यरची साथ मिळाली होती. त्यांच्या 51 धावांची भागीदारीही झाली. पण अय्यरला राहुल चाहरने 14 व्या षटकात 11 धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतकी खेळी करत राणाही 16 व्या षटकात चाहरविरुद्धच खेळताना बाद झाला. राणाने 38 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावांची खेळी केली.

मात्र यानंतर रिंकू सिंग आणि आंद्र रसेलची जोडी जमली. नंतर या दोघांनी कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलने 23 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत 42 धावा केल्या, तसेच रिंकू 10 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला.

पंजाबकडून राहुल चाहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. पण प्रभसिमरन 12 धावांवरच बाद झाला, त्यानंतर भानुका राजपक्षेही शुन्यावर बाद झाला. या दोघांनाही हर्षित राणाने यष्टीरक्षक गुरबाजच्या हातून झेलबाद केले. 6 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने लियाम लिव्हिंगस्टोनचा मोठा अडथळा दूर केला. त्याने त्याला 15 धावांवर पायचीत केले.

पण एका बाजूने विकेट जात असताना शिखरने दुसरी बाजू सांभाळली होती. त्याला नंतर जितेश शर्माची साथ मिळाली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत कोलकाताला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. पण त्यानंतर लेगचच जितेशला 13 व्या षटकात चक्रवर्तीनेच बाद केले. जितेशने 18 चेंडूत 21 धावा केल्या. तसेच त्याच्यात आणि शिखरमध्ये 53 धावांची भागीदारी झाली.

शिखरही नंतर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर 15 व्या षटकात बाद झाला. त्याला नितीश राणाने बाद केले. शिखरने 47 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 57 धावांची खेळी केली. नंतर ऋषी धवन (19) आणि सॅम करन (4) यांच्याही विकेट्स लवकर पडल्या.

पण अखेरीस शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी 8 व्या विकेटसाठी आक्रमक 40 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे पंजाबला 20 षटकात 7 बाद 179 धावा उभारता आल्या. शाहरुख 8 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 21 धावांवर नाबाद राहिला. तसेच हरप्रीत 9 चेंडूत 2 चौकर आणि 1 षटकारांसह 17 धावा करून नाबाद राहिला.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हर्षित राणाने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय सुयश शर्मा आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT