KKR vs LSG  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: लखनऊविरुद्ध 'करो वा मरो'च्या सामन्यात कोलकाताने जिंकला टॉस! असे आहेत दोन्ही टीमचे Playing XI

आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत शनिवारी दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होत आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजे ईडन गार्डन्सवर होत आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी कोलकाताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण लखनऊने दीपक हुडा ऐवजी करन शर्माला संधी दिली आहे. तसेच स्वप्निल सिंग ऐवजी कृष्णप्पा गॉथमला संधी दिली आहे.

या सामन्यासाठी लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रेहमनुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, आंद्र रसेल आणि सुनील नारायण या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना केवळ भारतीय खेळाडूलाच खेळवता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये कोलकाताने सुयश शर्मा, मनदीप सिंग, अनुकूल रॉय, एन जगदीशन, डेव्हिड विसे यांना निवडले आहे. तसेच लखनऊने राखीव खेळाडूंमध्ये काईल मेयर्स, यश ठाकूर, डॅनिएल सॅम्स, युधवीर सिंग चरक आणि दीपक हुडा यांची निवड केलेली आहे.

हा सामना कोलकातासाठी करो वा मरो सामना आहे. या सामन्यात जर विजय मिळवला, तरच कोलकालाचे आव्हान जिवंत राहाणार आहे. तसेच कोलकाताने विजय मिळवला, तरी त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, या सामन्यात लखनऊने विजय मिळवल्यास ते थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील आणि कोलकाताचे आव्हान संपुष्टात येईल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • कोलकाता नाईट रायडर्स - रेहमनुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्र रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

  • लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), करण शर्मा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गॉथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT