Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: गुजरातने कोलकाताला पराभूत करत गाठला अव्वल क्रमांक! गुरबाजची 81 धावांची खेळी व्यर्थ

आयपीएल २०२३ मध्ये आज गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना पार पडला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. हा गुजरातचा सहावा विजय ठरला असून त्यांनी आता गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला.

या सामन्यात 180 धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतरही साहा पाचव्या षटकात 10 धावांवर आंद्रे रसेलविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे 41 धावांची सलामी भागीदारी मोडली.

पण त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने गिलला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण 11 व्या षटकात हार्दिक पंड्या हर्षित राणाविरुद्ध खेळताना पायचीत झाला. हार्दिकने 26 धावांची खेळी केली. त्याच्या पुढच्याच षटकात शुभमन गिलला सुनील नारायणने बाद केले. त्यामुळे गिलचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. तो 35 चेंडूत 8 चौकारांसह 49 धावा करून बाद झाला.

पण त्यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी कोलकाताला यश मिळू दिले नाही. त्यांनी नाबाद 87 धावांची भागीदारी करत गुजरातला विजय मिळवून दिला. विजय शंकरने या भागीदारीदरम्यान नाबाद अर्धशतकी खेळी केली. तो 24 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 51 धावा केल्या. तसेच डेव्हिड वॉर्नरने नाबाद 32 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून एन जगदीशन आणि रेहनुल्लाह गुरबाज यांनी डावाची सुरुवात केली. पण जगदीशन 19 धावा करून तिसऱ्या षटकात बाद झाला. तसेच या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला शार्दुल ठाकूर खास काही करू शकला नाही. तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा देखील स्वस्तात बाद झाले.

पण त्यानंतर रिंकू सिंगने एक बाजू सांभाळलेल्या गुरबाजला चांगली साथ दिली होती. गुरबाजने आक्रमक पवित्रा स्विकारला होता. पण तो 16 व्या षटकात नूर अहमदविरुद्ध खेळताना बाद झाला. गुरबाजने 39 चेंडूत 81 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकार मारले.

दरम्यान, तो बाद झाल्यानंतर रिंकू सिंगही 19 धावा करून बाद झाला. पण अखेरीस डेव्हिड विसेला साथीला घेत आंद्रे रसेलने काही आक्रमक फटके मारले. पण तो डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 19 चेंडूत 34 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. विसे 8 धावांवर नाबाद राहिला.

गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जोशुआ लिटिल आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT