Jason Roy Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 6,6,6...रॉयचे आक्रमण, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 4 सिक्स! गोलंदाजाच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Video: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध जेसन रॉयने ताबडतोड फिफ्टी ठोकताना एकाच षटकात चार षटकार खेचले.

Pranali Kodre

Jason Roy hit four sixes in an over: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 21 धावांनी विजय मिळवला. या विजयात कोलकाताचा सलामीवीर जेसन रॉयच्या तुफानी खेळीचाही महत्त्वाचा वाटा राहिला.

या सामन्यात बेंगलोरचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण कोलकाताकडून जेसन रॉय आणि एन जगदीशन यांनी चांगली सुरुवात केली. एक बाजू जगदीशनने सांभाळली असताना रॉयने आक्रमक फलंदाजी केली.

त्याने पॉवरप्लेच्या अखेरच्या म्हणजेच डावाच्या 6 व्या षटकात तुफानी फटकेबाजी करताना 4 षटकार ठोकले. या षटकात बेंगलोरकडून शाहबाज अहमदने गोलंदाजी केली. त्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जगदीशनने एकेरी धाव घेतली. त्यानंतर पुढच्या तिन्ही चेंडूवर रॉयने खणखणीच षटकार खेचले.

त्यानंतर पाचव्या चेंडू निर्धाव टाकण्यात शाहबाजने यश मिळवले. मात्र, पुन्हा रॉयने षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचला. त्यामुळे या षटकात एकूण 25 धावा निघाल्या. यातील 24 धावा तर रॉयने चार षटकारातच वसूल केल्या. त्यामुळे शाहबाजने टाकलेले हे षटक आयपीएल 2023 हंगामातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे षटक ठरले.

आयपीएल 2023 हंगामात सर्वात महागडे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या नकोशा यादीत पहिल्या क्रमांकावर अर्जुन तेंडुलकर आणि यश दयाल आहेत. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू अर्जुनने पंजाब किंग्सविरुद्ध आणि गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एका षटकात प्रत्येकी 31 धावा खर्च केल्या होत्या.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक असून त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच 28 धावा खर्च केल्या होत्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर शाहबादबरोबरच मुंबई इंडियन्सचा कॅमेरॉन ग्रीन देखील आहे. त्यानेही पंजाब किंग्सविरुद्ध एका षटकात 25 धावा दिल्या होत्या.

कोलकाताने जिंकला सामना

या सामन्यात रॉयने कोलकाताकडून सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. त्याने 29 चेंडूत ही खेळी करताना 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने जगदीशनबरोबर 83 धावांची भागीदारी केली. पण जगदीशन आणि रॉय या दोघांनाही एकाच षटकात विजयकुमार वैशाखने बाद केले. जगदीशन 27 धावांवर बाद झाला.

पण त्यानंतरही कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी 80 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. पण हे दोघेही एकाच षटकात बाद झाले. त्यांना वनिंदू हसरंगाने बाद केले. राणाने 21 चेंडूत 48 धावांची खेळी केली, तर वेंकटेशने 26 चेंडूत 31 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला 20 षटकात 5 बाद 200 धावा करता आल्या.

त्यानंतर बेंगलोरने 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 8 बाद 179 धावाच केल्या. बेंगलोरकडून विराट कोहलीने 54 धावांची खेळी केली. तसेच महिपाल लोमरोरने 34 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही. तसेच कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सुयश शर्मा आणि आंद्र रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT