GT vs KKR
GT vs KKR Dainik Gomantak
क्रीडा

एकिकडे आनंद, दुसरीकडे निराशा! हॅट्रिक, सलग 5 सिक्स... नाट्यमय GT vs KKR सामन्याचा पाहा अखेरचा क्षण

Pranali Kodre

IPL 2023, GT vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात रविवारी (9 एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सने विजय मिळवला. केकेआरसाठी रिंकू सिंग विजयाचा हिरो ठरला.

दरम्यान, सामन्यानंतर मात्र दोन वेगवेगळ्या भावना पाहायला मिळाल्या. अशक्य वाटणारा विजय मिळवलेल्या केकेआरच्या गोटात आनंद होता, तर अखेरच्या क्षणी पराभवाचा धक्का मिळालेल्या गुजरातच्या संघात निराशा स्पष्ट दिसत होती. या क्षणांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

केकेआरचा अखेरच्या क्षणी विजय

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शन (53) आणि विजय शंकर (63) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 204 धावा करत गुजरातसमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून वेंकटेश अय्यरनेही (83) शानदार अर्धशतकी खेळी साकारली होती. त्याला कर्णधार नितीश राणाची (45) चांगली साथ मिळालेली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर गुजरातचा प्रभारी कर्णधार राशिद खानने विकेट्सची हॅट्रिक घेत सामना आपल्या बाजूने जवळपास वळवला होता.

मात्र अखेरच्या 5 चेंडूत 28 धावांची गरज असताना केकेआरकडून रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार ठोकले आणि केकेआरला विजय मिळवून दिला.

या नाट्यमय ठरलेल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकल्यानंतर केकेआरचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य पळत मैदानावर आले. त्यांनी रिंकूला मिठी मारत कौतुकाची थाप दिली. यावेळी केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत हे रिंकूला मिठी मारताना भावनिक झालेलेही दिसून आले.

मात्र, दुसरीकडे अखेरच्या षटकात गोलंदाजी करणारा यश दयाल खूपच निराश झालेला दिसला. त्याने रुमाल डोळ्यांवरही ठेवला होता. तसेच गुजरातचे खेळाडूही निराश झाले होते.

गुजरातचा पहिला पराभव

दरम्यान, हा गुजरात आणि केकेआरचा आयपीएल 2023 हंगामातील प्रत्येकी तिसरा सामना होता. गुजरातने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे गुजरातला पहिल्याच पराभवाचा सामोरे जावे लागले. तसेच केकेआरचा मात्र हा सलग दुसरा विजय होता. त्यांनी आत्तापर्यंत फक्त पहिल्या सामन्यात पराभव स्विकारला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT