Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 साठी BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'या' शहरात पहिल्यांदाच होणार सामना!

IPL 2023 Full Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) सीझन 31 मार्चपासून सुरु होत आहे. आगामी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Manish Jadhav

IPL 2023 Full Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा सीझन 31 मार्चपासून सुरु होत आहे. आगामी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी देशभरातील 12 स्टेडियममध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएलचा पहिला चॅम्पियन असलेल्या राजस्थान रॉयल्सला यावेळी दोन होम ग्राउंड्स असतील. जयपूर व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सचा संघ अशा शहरात खेळेल, जिथे आतापर्यंत एकही आयपीएल सामना खेळला गेला नाही.

या शहरात प्रथमच आयपीएल सामना खेळवला जाणार

एप्रिल 2023 मध्ये गुवाहाटी प्रथमच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चे सामने आयोजित करेल. BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) ने राजस्थान रॉयल्सच्या दोन घरच्या सामन्यांचे यजमानपद गुवाहाटीकडे सोपवले आहे.

आसाम क्रिकेट असोसिएशनचे (एसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीतम महानता यांनी सांगितले की, राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करेल तर दुसऱ्या सामन्यात त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होईल.

IPL 2023 साठी राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ

लिलावात खरेदी केलेले खेळाडू:

जो रुट (1 कोटी), अब्दुल बासित (20 लाख), आकाश वशिष्ठ (20 लाख), एम अश्विन (20 लाख), केएम आसिफ (30 लाख), अॅडम झाम्पा (30 लाख), कुणाल राठौर (20 लाख), डोनोवन फरेरा (20 लाख), जेसन होल्डर (5.75 कोटी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT