Wridhhiman Saha Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: विकेटकिपर साहाची चतुराई अन् पंजाबचा फलंदाज बाद, कॅप्टन पंड्याही झाला खूश, पाहा Video

Video: गुजरात टायटन्सचा विकेटकिपर वृद्धिमान साहाने पंजाब किंग्सविरुद्ध चतुराई दाखवल्याने पंजाबच्या फलंदाजाला विकेट गमवावी लागली.

Pranali Kodre

Wriddhiman Saha forced Hardik Pandya to take an DRS: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 18 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात गुरुवारी (13 एप्रिल) पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात गुजरातचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने दाखवलेल्या चतुराईने अनेकांनी कौतुक केले आहे.

झाले असे की या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी 13व्या षटकात गुजरातकडून मोहित शर्मा गोलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंजाबचा फलंदाज जितेश शर्मा बीट झाला. त्याच्या बॅटच्या जवळून चेंडू गेला. तो चेंडू यष्टीरक्षण करत असलेल्या साहाने पकडला. त्यानंतर त्याने जोरदार अपीलही केले.

पण हे अपील त्याने एकट्यानेच केले. मोहित किंवा अन्य सहकाऱ्यांना फारसे जोरदार अपील केले नाही. पंचांनीही जितेशला नाबाद घोषित केले. पण साहाने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला रिव्ह्यू घेण्यासाठी सांगितले. सुरुवातीला हार्दिक तयार होत नव्हता, पण साहाचा आग्रह पाहाता त्याने एकदम अखेरच्या क्षणी रिव्ह्यू घेतला.

महत्त्वाचे म्हणजे रिव्ह्यूमध्ये चेंडूने जितेशच्या बॅटला हलकासा स्पर्श केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि जितेश 25 धावा करून माघारी परतला. या यशस्वी रिव्ह्यूनंतर हार्दिकही खूश झाला, तसेच गुजरातमधील खेळाडूंनीही साहाच कौतुक केले.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 153 धावा केल्या. त्यांच्याकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तसेच गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. त्याने 49 चेंडूत 67 धावांची खेळी केली. तसेच वृद्धिमान साहाने 30 धावांची खेळी केली. त्यामुळे 19.5 षटकात गुजरातने ४ विकेट्स गमावत 154 धावा करत सामना जिंकला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT